Poco F8 Ultra Geekbench वर दिसताच चर्चेला उधाण; स्कोअर पाहून चाहत्यांमध्ये वाढली उत्सुकता

POCO F8 Ultra मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा लॉन्च केला जाऊ शकतो. लीक्सनुसार, यामध्ये बॅक पॅनलला 50 MP Light Fusion 950 सेंसर दिला जाईल

Poco F8 Ultra Geekbench वर दिसताच चर्चेला उधाण; स्कोअर पाहून चाहत्यांमध्ये वाढली उत्सुकता

Photo Credit: POCO

POCO F8 Ultra 16GB लिस्ट, 12GB रॅम व्हेरिएंट लॉन्च होणार

महत्वाचे मुद्दे
  • POCO F8 सीरीज मध्ये POCO F8 Pro आणि POCO F8 Ultra चा समावेश
  • POCO F8 Ultra ला Geekbench वर 25102PCBEG मॉडल नंबर सोबत लिस्ट करण्यात आले
  • POCO F8 Ultra मध्ये Qualcomm च्या Snapdragon 8 Elite Gen 5 प्रोसेसरचा समा
जाहिरात

POCO F8 सीरीजची सध्या तयारी सुरू आहे. लवकरच हा स्मार्टफोन बाजारात येण्याची दाट शक्यता आहे. यामध्ये POCO F8 Pro आणि POCO F8 Ultra लॉन्च केला जाऊ शकतो. मागील काही दिवसांमध्ये या फोनशी निगडीत काही लीक्स समोर आले आहेत. या सीरीज मधील अल्ट्रा मॉडेल बेंचमार्क प्लॅटफॉर्म Geekbench वर लीस्ट करण्यात आला आहे. यामध्ये POCO F8 Ultra ची रॅम, प्रोसेसर,ओएस आणि जीपीयू ची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे हा एक पॉवरफूल फोन असल्याची माहिती समोर आली आहे.POCO F8 Ultra ला Geekbench वर 25102PCBEG मॉडल नंबर सोबत लिस्ट करण्यात आले आहे. हे लिस्टिंग 12 नोव्हेंबरचे आहे. बेंचमार्क स्कोअर पाहता तो POCO F8 Ultra साठी सिंगल कोअर मध्ये 3327 पॉईंट्स आहे. तर मल्टी कोअर बेंचमार्क स्कोअर 9872 आहे. हा स्कोअर फोनच्या प्रोसेसिंग क्षमतेला दाखवते. F8 Ultra हेवी टास्क सांभाळण्यास सक्षम आहे.

गीकबेंच लिस्टिंग मध्ये हे स्पष्ट झाले आहे की POCO F8 Ultra मध्ये Qualcomm च्या Snapdragon 8 Elite Gen 5 प्रोसेसरचा समावेश असणार आहे. हा ऑक्टा कोअर सीपीयू 3.63 GHz क्लॉक स्पीड सोबत 4.61GHz पर्यंत क्लॉक स्पीड वर चालण्याची क्षमता ठेवतो. हेवी मोबाईल गेमिंग आणि अन्य काम या चीपसेट वर सहज रन केली जाऊ शकते. त्यामध्ये प्रोसेसिंग स्पीड देखील कमी होत नाही.

POCO F8 Ultra ला बेंचमार्किंग प्लॅटफॉर्म वर 16 जीबी रॅम सोबत लिस्ट केले जाणार आहे. हा मोबाईलचा टॉप व्हेरिएंट असणार आहे. कंपनी याला 12 जीबी रॅम वर लॉन्च करणार आहे. गीकबेंच च्या माहितीनुसार, हा स्मार्टफोन android 16 OS वर लॉन्च केला जाऊ शकतो. त्यामध्ये ग्राफिक्स पाहता Adreno 840 GPU दिले जाण्याची माहिती आहे.

फोनमधील अन्य स्पेसिफिकेशन्सची माहिती घेता लीक्स नुसार या आगामी POCO फोनमध्ये 6.9-इंचाचा 2K AMOLED डिस्प्ले असण्याचा अंदाज आहे. त्यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 2560Hz इंस्टेंट टच सॅम्पलिंग रेट आणि 3500nits पीक ब्राइटनेस चा समावेश आहे. तर पॉवर बॅकअप मध्ये 100W वायर्ड आणि 50W वायरलेस चार्जिंग सोबत 7560mAh बॅटरी दिली जाऊ शकते. POCO F8 Ultra मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा लॉन्च केला जाऊ शकतो.

ces_story_below_text

Gadgets 360 Staff रेसिडेंट बॉट. जर तुम्ही मला ईमेल केलात तर एक माणूस प्रतिसाद देईल. अधिक

जाहिरात

जाहिरात

© Copyright Red Pixels Ventures Limited 2026. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »