सर्वात वेगवान प्रोसेसर Snapdragon 8 Elite लाँच! स्मार्टफोनची बॅटरी वाचवणार, 2.5 तास अधिक गेमिंग करू शकणार

Single आणि Multi-Core Performance चा विचार करता परफॉर्मन्स मध्ये 45% सुधारणा आहे तर वेब ब्राउझिंगमध्ये 62 टक्के सुधारणा होईल

सर्वात वेगवान प्रोसेसर Snapdragon 8 Elite लाँच! स्मार्टफोनची बॅटरी वाचवणार, 2.5 तास अधिक गेमिंग करू शकणार

Photo Credit: Qualcomm

Snapdragon 8 Elite chipset is the successor to 2023's Snapdragon 8 Gen 3

महत्वाचे मुद्दे
  • Snapdragon 8 Elite चिपसेट 3nm प्रक्रिया वापरून तयार केला आहे
  • Qualcomm च्या दाव्यानुसार, ते 8 Gen 3 पेक्षा 27 टक्के अधिक कार्यक्षम आहे
  • Snapdragon 8 Elite chip सह असलेले स्मार्टफोन 320-मेगापिक्सेल कॅमेरा सेन्स
जाहिरात

Hawaii मध्ये झालेल्या Snapdragon Summit ने Snapdragon 8 Elite chipset ही Qualcomm कडून समोर आणली आहे. Snapdragon 8 Gen 3 नंतर आता या चीपसेट मुळे परफॉर्मन्स मध्ये मोठा बदल होणार आहे. नवीन चिपसेटच्या मदतीने, फोन कंपन्या त्यांच्या युजर्सना अनेक चांगली AI फीचर्स देऊ शकणार आहेत. त्यांच्या AI इंजिनमध्ये सर्वात वेगवान Qualcomm Hexagon NPU असणार आहे. हे मागील मॉडेलच्या तुलनेत AI ची कामगिरी 45 टक्क्यांनी सुधारणार आहे. नवीन चिपसेटच्या मदतीने 5G कनेक्टिव्हिटी आणि त्याची कार्यक्षमता देखील सुधारली जाईल, असा दावा करण्यात आला आहे.

Qualcomm ची Snapdragon 8 Elite SoC येत्या काही आठवड्यामध्ये उपलब्ध होणार आहे. Asus, Honor, iQOO, OnePlus, Oppo, Realme, Samsung, Vivo आणि Xiaomi यांच्या आगामी मॉडेल मध्ये ही चिपसेट वापरली जाणार आहे.

Qualcomm च्या माहितीनुसार, Snapdragon 8 Elite चिपसेट, मॉडेल नंबर SM8750-AB सह, स्नॅपड्रॅगन 8 Gen 3 च्या वर फ्लॅगशिप उपकरणांसाठी असणार आहे. चीप 3-नॅनोमीटर फॅब्रिकेशन प्रक्रियेवर आधारित 64-बिट आर्किटेक्चरवर तयार केली गेली आहे आणि त्यात 4.32GHz च्या पीक क्लॉक स्पीडसह आठ कोर असलेले सेकंड जनरेशन कस्टम-बिल्ट क्वालकॉम ओरियन CPU आहे.

रिपोर्ट्सनुसार, नवीन प्रोसेसर मागील मॉडेलपेक्षा वेगवान आहे. सिंगल आणि मल्टी-थ्रेडेड बेंचमार्कमध्ये CPU चे काम 45 पट वाढवते आणि मागील मॉडेलपेक्षा 44 टक्के अधिक ऊर्जा कार्यक्षम आहे. असा दावा करण्यात आला आहे.

स्नॅपड्रॅगन 8 एलिटमध्ये 4.32 GHz पर्यंत 2 प्राइम कोर आणि 3.53 GHz पर्यंत 6 परफॉर्मन्स कोर आहेत. यात सर्वात वेगवान LPDDR5X मेमरी 5300 MHz आहे. स्नॅपड्रॅगन 8 एलिट केवळ कामगिरीच्या पातळीवरच नव्हे तर मोबाइल गेमिंगसाठीही शक्तिशाली बनवण्यात आले आहे. यामुळे फोनची बॅटरी वाचते आणि अडीच तास अधिक गेमिंग करता येते.

या चिपचे AI इंजिन फोटो आणि व्हिडिओचा अनुभव सुधारणार आहेत. रिअल-टाइम AI रिलायटिंग फीचर मुळे आपल्या सेल्फी आणि व्हिडिओंमधील प्रकाश आपोआप दुरुस्त केला जाऊ शकतो, ज्यामुळे आपण व्हिडिओ कॉल किंवा सोशल मीडिया पोस्ट अधिक चांगल्या करू शकता. व्हिडीओ ऑब्जेक्ट इरेजरसह तुम्ही फक्त एका टॅपने व्हिडिओमधून नको असलेल्या वस्तू काढू शकता.

Comments
Gadgets 360 Staff
 ...अधिक
        
    

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. TENAA लिस्टिंगमध्ये समोर आले Moto G36 चे डिझाईन व स्पेसिफिकेशन्स
  2. Poco F7 5G ची किंमत फ्लिपकार्ट बिग बिलियन डेजमध्ये घसरली; पहा आता किंमत काय
  3. ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल 2025 मध्ये इको डिव्हाइस वर मिळणार मोठी सूट
  4. Amazon Great Indian Festival Sale 2025 मध्ये सोनी, सॅमसंग, TCL स्मार्ट टीव्हीवर आकर्षक डील्स जाहीर
  5. ॲपलकडून iOS 26 अपडेटसह iPadOS 26 व macOS Tahoe लॉन्च; पहा पात्र डिव्हाईसची यादी
  6. : Oppo F31 Series मध्ये Pro+, Pro आणि F31 5G चा समावेश; पहा काय आहेत फीचर्स
  7. फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलमध्ये Nothing Phone 3 अवघ्या 34,999 रूपयांत विकत घेण्याची संधी
  8. Realme P3 Lite 5G भारतात लॉन्च; पहा किंमत, स्पेसिफिकेशन्स काय
  9. iQOO 15 मध्ये 2K Samsung AMOLED डिस्प्ले; समोर आली माहिती
  10. Realme चा नवा P-Series स्मार्टफोन P3 Lite 5G आला दमदार फीचर्स आणि किफायतशीर किंमतीमध्ये
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »