Realme 14T भारतात लवकरच होणार लॉन्च; पहा काय असू शकते प्राईज रेंज

Realme 14T 8GB RAM + 128GB storage variant ची किंमत Rs. 17,999 असू शकते तर 8GB RAM + 256GB ची किंमत Rs. 18,999 असू शकते

Realme 14T भारतात लवकरच होणार लॉन्च; पहा काय असू  शकते प्राईज रेंज

Photo Credit: 91mobiles

Realme 14T हा Realme 14 मालिकेत एक नवीन भर असण्याची अपेक्षा आहे.

महत्वाचे मुद्दे
  • Realme 14T हा फोन 8GB RAM आणि 128GB व 256GB स्टोरेज ऑप्शन सह उपलब्ध असणार
  • Realme कडून 6,000mAh battery फोनमध्ये असणार आहे
  • Realme 14T IP69-rated build असल्याने पाणी आणि धूळीपासून सुरक्षित
जाहिरात

Realme 14 आपल्या रेंज मध्ये वाढ करत आहे. नुकताच मार्चमध्ये पहिल्यांदा समोर आलेल्या Realme 14T बद्दल अधिक माहिती मिळाली आहे. हे ब्रँडचे पहिले "T" मॉडेल असल्याचे म्हटले जाते आणि ते भारतात 8GB RAM आणि 128GB स्टोरेज असलेल्या मॉडेलची किंमत 17,999 रुपये पासून सुरू होईल असे म्हटले जात आहे. जर तुम्हाला स्टोरेज दुप्पट करायचे असेल तर तुम्हाला 18,999 रुपये द्यावे लागतील. अद्याप अधिकृतपणे फोन लॉन्चची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. काही लिक्स मधून फोनच्या किंमतीबद्दल माहिती दिली आहे. Realme 14T हा फोन 8GB RAM आणि 128GB व 256GB स्टोरेज ऑप्शन सह उपलब्ध असणार आहे. यामध्ये MediaTek Dimensity 6300 chipset असणार आहे अशी माहिती समोर आली आहे. Realme कडून 6,000mAh battery फोनमध्ये असणार आहे. हा फोन IP69-rated build असल्याने पाणी आणि धूळीपासून सुरक्षित आहे.

Realme 14T ची भारतात किंमत काय असू शकते?

91Mobiles, च्या माहितीनुसार, Realme 14T ची भारतात किंमत काय असू शकते? याची माहिती सूत्राच्या हवाल्याने देण्यात आली आहे. त्यांच्या माहितीनुसार 8GB RAM + 128GB storage variant ची किंमत Rs. 17,999 असू शकते तर 8GB RAM + 256GB ची किंमत Rs. 18,999 असू शकते.

Realme 14T चा प्रोमो इमेजही समोर आला आहे. यामध्ये फोनच्या खरेदीवर 1 हजार रूपयांचे इंस्टंट डिस्काऊंट मिळू शकते. फोनमध्ये AMOLED display, 2,100 nits peak brightness, IP69-rated build,6,000mAh battery चा अंदाज आहे. हा फोन mountain green आणि lightning purple रंगांमध्ये उपलब्ध आहे.

Realme 14T हा Realme 14 series मधील आगामी फोन आहे. हा फोन AliExpress वर स्पॉट झाला होता. त्यावेळी फोनचे काही फीचर्स समोर आले. त्यामध्ये 6.6-inch full-HD+ (1,080x2,340 pixels) display, 120Hz refresh rate,dual rear camera आणि 50-megapixel main camera, 32-megapixel selfie shooter यांचा त्यामध्ये समावेश होता. फोनमध्ये 100W charging support आहे.

Realme 14T मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर असण्याची अफवा आहे. हे अँड्रॉइड 15-आधारित Realme UI 6.0 सह येऊ शकते आणि 5G आणि NFC कनेक्टिव्हिटी देऊ शकते. फोनचा आकार 163.1 x 75.6 x 7.9 मिमी आणि वजन 196 ग्रॅम असल्याचे म्हटले जाते.

Gadgets 360 Staff रेसिडेंट बॉट. जर तुम्ही मला ईमेल केलात तर एक माणूस प्रतिसाद देईल. अधिक

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. OnePlus Nord Buds 4 Pro भारतात १९ मार्चला लॉन्च होणार
  2. Samsung Galaxy M17 5G भारतात लॉन्च; ५०MP कॅमेरा आणि ५,०००mAh बॅटरीसह दमदार फीचर्स
  3. WhatsApp अपडेट: इमोजी टाइप करताच मिळणार संबंधित स्टिकर्स, iPhone युजर्ससाठी नवीन फीचर
  4. वनप्लस 15T चे डिझाइन आणि रंग पर्याय अधिकृतपणे जाहीर; चीन लॉन्चपूर्वी फीचर्स समोर
  5. iQOO Z11 Turbo चा टीझर समोर; लवकरच लॉन्च, जबरदस्त बॅटरी आणि फास्ट चार्जिंगची शक्यता
  6. SIM Binding नियम काय आहे? मेसेजिंग अॅप्स आणि वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार
  7. Poco C85x 5G लवकरच भारतात; Flipkart मायक्रोसाइटवर डिझाइनची झलक
  8. Google Pixel 10a भारतात विक्रीसाठी उपलब्ध; 48MP कॅमेरा, 5100mAh बॅटरीसह किंमत ₹49,999
  9. Motorola Edge 70 Fusion किंमत आणि उपलब्धता
  10. Nothing Phone 4a सीरिज भारतात लॉन्च; किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाहीर
© Copyright Red Pixels Ventures Limited 2026. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »