Realme 15 सीरीज 5G भारतात अधिकृतरित्या लाँच झाला असून त्याच्या किंमती 23,999 रुपये पासून पुढे आहेत
Photo Credit: Realme
Realme 15 5G सिरीजचे फोन IP66+IP68+IP69 धूळ आणि पाण्याच्या प्रतिकार रेटिंगला पूर्ण करतात असा दावा केला जातो
Realme कडून नवी मिड रेंज स्मार्टफोन मॉडेल्स Realme 15 Pro 5G आणि Realme 15 5G ची घोषणा झाली आहे. दोन्ही स्मार्टफोन्स हे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सच्या बाबतीत अपग्रेड आणि रिडिझाईन करण्यात आले आहेत. Realme कडून हे स्मार्टफोन्स “AI Party Phone” म्हणून समोर आणले जात आहेत. फोनमधील नवी AI-powered features,camera capabilities आणि performance त्याची वैशिष्ट्यं आहेत. Realme च्या या नव्या 15 सीरीज मध्ये कॅमेरा आणि परफॉर्ममन्स सुधारण्यासोबतच बॅटरी 7000mAh Titan battery आहे. जी ग्राहकांना आकर्षित करू शकते. हा स्मार्टफोन विशेष किंमती मध्ये सुरूवातीला विकला जाणार आहे.
Realme 15 Pro 5G हा Flowing Silver, Velvet Green, आणि Silk Purple या रंगांमध्ये उपलब्ध आहे. हा फोन चार व्हेरिएंट मध्ये उपलब्ध आहे.
Realme 15 5G हा तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे. Flowing Silver, Velvet Green आणि Silk Pink रंगात तो उपलब्ध होणार असून याचे देखील 3 व्हेरिएंट आहेत.
Realme 15 Pro 5G खरेदी करताना निवडक बँकांवर 3000 रुपयांचा instant discount मिळणार आहे. Realme 6000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 12 महिन्यांपर्यंत नो कॉस्ट EMI देखील देत आहे. जर तुम्ही Realme 15 5G खरेदी केला तर तुम्हाला निवडक बँकांवर 2000 रुपयांचा instant discount मिळणार आहे. फोन खरेदी करताना 50000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 9 महिन्यांपर्यंत No Cost EMI देखील मिळू शकतो. प्री-ऑर्डर Realme इंडिया वेबसाइटवर लाइव्ह असून विक्री 30 जुलै रोजी फ्लिपकार्ट, realme.com, ऑफलाइन रिटेल स्टोअरमध्ये होणार.
Realme 15 Pro 5G मध्ये 6.8-इंचाचा HyperGlow 4D curve+ display आहे ज्याचा रिफ्रेश रेट 144Hz आणि 6500nits पर्यंतचा पीक ब्राइटनेस आहे. हा स्मार्टफोन Snapdragon 7 Gen 4 processor ने सुसज्ज आहे जो 12GB पर्यंत रॅम आणि 512GB पर्यंत अंतर्गत स्टोरेजसह येतो. यात 50MP ड्युअल कॅमेरा सेटअप आणि 50MP सेल्फी कॅमेरा आहे. Realme 15 Pro 5G स्मार्टफोनला 80W अल्ट्रा चार्जला सपोर्ट करणारी 7000mAh ची मोठी बॅटरी आहे.
Realme 15 5G मध्ये 144Hz रिफ्रेश रेट आणि 6500nits पर्यंत पीक ब्राइटनेससह 6.8-इंचाचा HyperGlow 4D curve+ display आहे. यामध्ये MediaTek Dimensity 7300+ 5G चिपसेट चा सपोर्ट आहे. जे 12GB पर्यंत RAM आणि 256GB पर्यंत अंतर्गत स्टोरेजसह जोडलेले आहे.
जाहिरात
जाहिरात