हा फोन एका collectable packaging मध्ये मिळेल, ज्यामध्ये Iron Throne फोन स्टँड, King चा हँड पिन, Westeros चं मिनिएचरचा समावेश आहे.
Realme 15 Pro 5G गेम ऑफ थ्रोन्स लिमिटेड एडिशनमध्ये मानक मॉडेलसारखेच वैशिष्ट्ये आहेत
Realme 15 Pro 5G Game of Thrones Limited Edition हा भारतासह ग्लोबल मार्केट मध्ये बुधवार, 8 ऑक्टोबर दिवशी लॉन्च झाला आहे.हा फोन जुलै महिन्यात आलेल्या Realme 15 Pro 5G चा लिमिटेड एडिशन म्हणून बाजारात आला आहे. नव्या लिमिटेड एडिशनमध्येही त्याच्या मूळ स्मार्टफोन प्रमाणेच फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स आहेत पण काही कॉस्मिक बदल करण्यात आले आहेत. HBO च्या Game of Thrones series वरून प्रेरणा घेत त्यामध्ये बदल करण्यात आले आहेत. ज्यात nano-engraved motifs आणि custom user interface थीम्सचा समावेश आहे.Realme 15 Pro 5G Game of Thrones Limited Edition ची भारतामधील किंमत काय?Realme 15 Pro 5G Game of Thrones Limited Edition भारतामध्ये सुमारे 44,999 रूपयांपासून सुरू होतो. हा स्मार्टफोन 12GB+512GB RAM आणि storage configuration सह येतो. ग्राहक हा स्मार्टफोन 41,999 रूपयांमध्ये विकत घेऊ शकतात. सध्या काही बॅंक कार्ड ऑफर्स मध्ये ग्राहकांना 3 हजारांची सूट देण्यात आली आहे. हा फोन फ्लिपकार्ट आणि काही रिटेल स्टोअर्सच्या माध्यमातून विकत घेतला जाऊ शकतो.
ग्राहकांना हा फोन एका collectable packaging मध्ये मिळेल, ज्यामध्ये Iron Throne फोन स्टँड, King चा हँड पिन, Westeros चं मिनिएचर, आणि Game of Thrones-branded stickers, postcards, accessories मिळतील.
Realme 15 Pro 5G गेम ऑफ थ्रोन्स लिमिटेड एडिशनमध्ये एक्सक्लुझिव्ह ब्लॅक आणि गोल्ड स्टाइलिंग आहे. कॅमेरा आयलंडवर 3D कोरलेली ड्रॅगन क्लॉ बॉर्डर आणि नॅनो-कोरीव केलेले मोटिफ्स आहेत. तीनही वेगवेगळ्या लेन्सभोवती लेन्स रिंग्ज आहेत. दरम्यान, फोनच्या खालच्या अर्ध्या भागात गेम ऑफ थ्रोन्स शोमधील हाऊस टार्गेरियनचे चिन्ह आहे, जे तीन डोक्यांच्या ड्रॅगनने दाखवले आहे.
स्पेशल एडिशन मध्येही हँडसेट Snapdragon 7 Gen 4 SoC चा सपोर्ट आहे. 50-मेगापिक्सेलचा Sony IMX896 प्रायमरी रिअर कॅमेरा आहे, जो 50-मेगापिक्सेल अल्ट्रावाइड-अँगल लेन्ससह जोडलेला आहे. समोर, हँडसेटमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 50-मेगापिक्सेल कॅमेरा आहे. कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये 5G, 4G, वाय-फाय, ब्लूटूथ 5.4, GPS आणि USB टाइप-सी पोर्टचा समावेश आहे. फोनमध्ये 7,000mAh बॅटरी आहे जी 80W वर वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
जाहिरात
जाहिरात