Realme C71 लाँच होताच बाजारात धुमाकूळ; सुमारे 10 हजारात 18 GB पर्यंत RAM

Realme C71 हा Unisoc T7250 चिपसेटवर चालतो.

Realme C71 लाँच होताच बाजारात धुमाकूळ; सुमारे 10 हजारात 18 GB पर्यंत RAM

Photo Credit: Realme

Realme C71 ब्लॅक नाईट आउल आणि स्वान व्हाइट रंगांमध्ये येतो.

महत्वाचे मुद्दे
  • व्हिएतनाम मध्ये Realme C71 लॉन्च
  • हा मोबाईल मिलिट्री ग्रेड Shockproof बॉडी सह
  • 4GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंटमध्ये फोन लाँच
जाहिरात

Realme ने भारतात त्यांच्या 'C' सीरीज मध्ये Realme C73 आता अजून एक स्वस्त फोन आणला आहे. तर दुसरीकडे परदेशी बाजारपेठेत व्हिएतनाम मध्ये C71 लॉन्च करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन या सीरीज मधील लो बजेट मोबाईल आहे. हा मोबाईल मिलिट्री ग्रेड Shockproof बॉडी आणि पॉवरफूल 6,300mAh Battery असलेला आहे. या फोनमध्ये अनेक प्रभावी फीचर्स आहेत, विशेषतः ज्यांना फार खर्च न करता दमदार फीचर्सचा फोन हवाअ आहे त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. फोनमध्ये पॉवरफूल बॅटरी आहे. आकर्षक डिझाईन आहे. मात्र C71 हा भारतात लॉन्च होईल का? याची माहिती देण्यात आलेली नाही.

Realme C71 ची ग्लोबल मार्केट मधील किंमत

Realme C71 स्मार्टफोन व्हिएतनाममध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा मोबाईल 4GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. व्हिएतनाम मध्ये त्याची किंमत 37,90,000 VND आहे. भारतीय रूपयामध्ये त्याची किंमत 12,450 रुपयांच्या जवळपास आहे.

Realme C71 चे ग्लोबल मार्केट मधील स्पेसिफिकेशन्स काय?

6.67″ एचडी+ डिस्प्ले आहे. फोनमध्ये UNISOC T7250 चिपसेट असून 6GB RAM + 128GB Storage चा पर्याय आहे. 12GB Dynamic RAM आहे. फोनमध्ये 50MP AI Camera असून 5MP Front Camera आणि 6,300mAh Battery सोबत 45W चार्जिंग सपोर्ट आहे. एका चार्जवर 9 तासांचा गेमिंग टाइम देऊ शकतो असा कंपनीचा दावा आहे.

व्हिएतनाममध्ये, हा स्वस्त स्मार्टफोन 4 GB RAM आणि 6 GB RAM व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. हे दोन्ही मॉडेल डायनॅमिक रॅम तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत जे मोबाईलच्या फिजिकल रॅममध्ये 12 GB व्हर्च्युअल रॅम जोडते आणि त्याला 18 GB RAM पर्यंत पॉवर देते. सध्या फक्त 4 GB RAM व्हेरिएंटची किंमत जाहीर केली आहे.

कॅमेराच्या दृष्टीनेही हा फोन खूप चांगला आहे, ज्यामध्ये 50 मेगापिक्सेलचा AI कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी समोर 5 मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये स्मार्ट टच फीचर देखील आहे. कंपनीचा दावा आहे की हे डिव्हाइस 1.5 मीटरवरून पडले तरीही ते सुरक्षित राहणार आहे.

फोन कोणत्या रंगांमध्ये उपलब्ध असेल?

सध्या फोन कंपनी कडून बांगलादेश आणि व्हिएतनामसह निवडक जागतिक बाजारपेठांमध्ये ब्लॅक नाईट आउल आणि स्वान व्हाइट रंगांच्या पर्यायांमध्ये फोन लाँच केला आहे.

Gadgets 360 Staff रेसिडेंट बॉट. जर तुम्ही मला ईमेल केलात तर एक माणूस प्रतिसाद देईल. अधिक

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. OnePlus Nord Buds 4 Pro भारतात १९ मार्चला लॉन्च होणार
  2. Samsung Galaxy M17 5G भारतात लॉन्च; ५०MP कॅमेरा आणि ५,०००mAh बॅटरीसह दमदार फीचर्स
  3. WhatsApp अपडेट: इमोजी टाइप करताच मिळणार संबंधित स्टिकर्स, iPhone युजर्ससाठी नवीन फीचर
  4. वनप्लस 15T चे डिझाइन आणि रंग पर्याय अधिकृतपणे जाहीर; चीन लॉन्चपूर्वी फीचर्स समोर
  5. iQOO Z11 Turbo चा टीझर समोर; लवकरच लॉन्च, जबरदस्त बॅटरी आणि फास्ट चार्जिंगची शक्यता
  6. SIM Binding नियम काय आहे? मेसेजिंग अॅप्स आणि वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार
  7. Poco C85x 5G लवकरच भारतात; Flipkart मायक्रोसाइटवर डिझाइनची झलक
  8. Google Pixel 10a भारतात विक्रीसाठी उपलब्ध; 48MP कॅमेरा, 5100mAh बॅटरीसह किंमत ₹49,999
  9. Motorola Edge 70 Fusion किंमत आणि उपलब्धता
  10. Nothing Phone 4a सीरिज भारतात लॉन्च; किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाहीर
© Copyright Red Pixels Ventures Limited 2026. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »