Realme C85 Pro 4G मध्ये 50 MPचा मुख्य मागील सेन्सर आणि 8 MPचा फ्रंट कॅमेरा आहे,
Photo Credit: Realme
Realme C85 5G मध्ये 6.8" HD+ LCD, 144Hz डिस्प्ले आहे
Realme ने त्यांच्या C सिरीज लाइनअपचा विस्तार करत दोन नवीन मॉडेल्स Realme C85 5G आणि Realme C85 Pro 4G लाँच केले आहेत. दोन्ही स्मार्टफोन्स अधिकृतपणे Vietnam मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत आणि भारतात, ते प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहेत. दोन्ही मध्यम श्रेणीच्या स्मार्टफोन्सना दोन्ही डिव्हाइसेसवर 7,000mAh बॅटरी, मोठा डिस्प्ले, चांगल्या फोटोग्राफी अनुभवासाठी हाय रिझोल्यूशन कॅमेरे आणि धूळ आणि पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी IP69 रेटेड पाठिंबा असेल. दोन्ही मॉडेल्स Android 15 OS वर चालतील, जे Realme UI 6 वर आधारित आहे.
Realme C85 5G मध्ये 6.8-इंचाचा HD+ LCD डिस्प्ले आहे, जो 144 Hz रिफ्रेश रेट, HBM मोडमध्ये 1,200 nits पीक ब्राइटनेस देतो. हे MediaTek Dimensity 6300 चिपसेटद्वारे सपोर्टेड असेल. फोन 8GB RAM आणि 256GB स्टोरेजसह जोडलेले आहे आणि मायक्रोएसडी द्वारे वाढवता येईल. हे 24 GB पर्यंत डायनॅमिक रॅमसह येते. 50MP Sony IMX852 प्रायमरी शूटर आणि 8MP फ्रंट शूटर सह येईल आणि फोनमध्ये 45W फास्ट चार्जिंगसह 7,000mAh बॅटरीद्वारे सपोर्ट आहे. Realme C85 5G चा आकार 166.07 × 77.93 × 8.38mm आहे तर वजन 215 ग्राम आहे.
Realme C85 Pro 4G मध्ये अधिक प्रीमियम स्पेसिफिकेशन्स आहेत, ज्यामध्ये 6.8 इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले आहे जो 120 Hz चा रिफ्रेश रेट आणि 5G च्या तुलनेत 4000 निट्स पर्यंतचा पीक ब्राइटनेस देतो. हे Snapdragon 685 चिपसेटद्वारे सपोर्टेड आहे. हे 8GB रॅम आणि 256 GB पर्यंत स्टोरेजने भरलेले आहे, जे 24 GB व्हर्च्युअल रॅमला सपोर्ट करते. फोनमधील कॅमेरा 50MP मुख्य मागील कॅमेरा, 8MP सेल्फी कॅमेरा असेल. तर फोनमध्ये 45W चार्जिंगसह 70000mAh बॅटरीद्वारे सपोर्टे आहेत. सोबतच फोनमध्ये ड्युअल स्पीकर्स, साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर, IP69-रेटिंग आहे. फोनचा आकार 164.40 × 77.99 × 8.09mm आहे तर वजन 205 ग्राम आहे.
जाहिरात
जाहिरात
Dyson Purifier Hot+Cool HP2 De-NOx, Purifier Hot+Cool HP1 Launched in India: Price, Features