Photo Credit: Realme
Realme GT 7 मध्ये असणार MediaTek Dimensity 9400e SoC; 27 मे दिवशी होणार लॉन्च
Realme GT 7 हा भारतासह ग्लोबल मार्केट मध्ये 27 मे दिवशी लॉन्च होणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 7,000mAh battery आहे. 120W wired fast charging आहे. कंपनी कडून आता चीप सेटची माहिती देण्यात आली आहे. फोनच्या चीपसेट डिटेल्सची माहिती देण्यात आली आहे. फोनचे काही डिस्प्ले फीचर्स देखील समोर आले आहेत. हा फोन Realme GT 7T variant सोबत येणार आहे. चीन मध्ये Realme GT 7 2025 वर्षाच्या सुरूवातीला लॉन्च करण्यात आला आहे. त्यामध्ये MediaTek Dimensity 9400+ SoC आणि 7,200mAh battery सोबत 100W wired fast charging support आहे.
Realme GT 7 मध्ये MediaTek Dimensity 9400e chipset चा समावेश आहे. असं कंपनी कडून जारी प्रेस रीलीजच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे. ही चीपसेट X4 prime core चा वापर करत आहे. Snapdragon 8 Gen 3 SoC सारख्याच प्रोसेस नोडवर बनवल्याचा दावा केला जातो. या फोनने 2.45 million पेक्षा जास्त AnTuTu score मिळवला आहे.
Realme चा दावा आहे की GT 7 हँडसेट GT Boost mode आणि सहा तासांपर्यंत स्थिर 120FPS BGMI गेमप्लेला सपोर्ट करेल. फोन "millisecond-level precision in performance allocation"ने सुसज्ज असल्याचे म्हटले जाते आणि "कमी वीज वापर आणि enhanced thermal management सह अल्ट्रा-स्मूथ गेमप्ले देतो.
Realme GT 7 च्या अधिकृत प्रोडक्ट पेज वर असे म्हटले आहे की फोनचा डिस्प्ले 6,000 nits पर्यंतच्या पीक ब्राइटनेसला सपोर्ट करेल. उल्लेखनीय बाब म्हणजे , चिनी व्हेरिएंटमध्ये 6,500 nits पर्यंतच्या पीक ब्राइटनेस लेव्हलसह 6.78-इंच 144Hz फुल-एचडी+ ओएलईडी डिस्प्ले आहे.
Realme GT 7 मध्ये 10 टक्के silicone anode 7,000mAh बॅटरी असेल आणि 120W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्ट असेल, जो हँडसेटला 15 मिनिटांत एक ते 50 टक्के चार्ज करण्यास मदत करेल असा दावा केला जातो. तो 7.5W रिव्हर्स चार्जिंगला देखील सपोर्ट करतो असे म्हटले जाते. फोनमध्ये एक बॅटरी-केंद्रित चिप 95 टक्क्यांपर्यंत कमी ओव्हरहिटिंग आणि बॅटरी लाइफ तीन पट वाढवण्याची खात्री देते असे म्हटले जाते.
Realme GT 7 हा स्मार्टफोन IceSense ब्लॅक आणि IceSense ब्लू रंगामध्ये येईल. थर्मल मॅनेजमेंटसाठी IceSense ग्राफीन तंत्रज्ञानाला सपोर्ट करेल. सोबत येणारा Realme GT 7T व्हेरिएंट काळ्या, निळ्या आणि पिवळ्या रंगात उपलब्ध असणार आहे.
जाहिरात
जाहिरात