Photo Credit: Realme
Realme GT 7 Pro (चित्रात) मध्ये 6,500mAh बॅटरी आहे.
Realme GT 7, जो यापूर्वी काही सर्टिफिकेशन आणि बेंचमार्किंग वेबसाईट वर दिसला होता त्याबद्दल आता अजून माहिती समोर येत आहे आणि लवकरच हा फोन लॉन्च होणार आहे याचे संकेत मिळत आहेत. लीक्स द्वारा फोन मधील काही महत्त्वाचे स्पेसिफिकेशन समोर आले आहेत. हा फोन Realme GT 7 Pro सोबतचा असेल जो चीन मध्ये नोव्हेंबर 2024 मध्ये समोर आला होता. दरम्यान, आणखी एका लीकमध्ये कथित Realme GT 8 Pro चे काही महत्त्वाचे फीचर्स सुचवण्यात आले आहेत. कंपनीने अद्याप दोन्ही हँडसेटच्या लाँचची पुष्टी केलेली नाही.
Realme GT 7 smartphone हा MediaTek Dimensity 9400+ chipset वर चालतो. अशी माहिती Weibo या सोशल मीडीया प्लॅटफॉर्म वर tipster Digital Chat Station ने लिहलं आहे. टीपस्टर च्या माहितीनुसार, अपेक्षित स्मार्टफोनमध्ये 7,000mAh पेक्षा मोठी बॅटरी असण्याची शक्यता आहे. पोस्टमध्ये, टिपस्टरने " 7X00mAh battery" असे म्हटलं आहे.
टिपस्टरनुसार, vanilla Realme GT 7 हा 100W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करू शकतो. फोनमध्ये सध्याच्या Realme GT 6 पेक्षा बारीक आणि हलक्या बिल्डसह फ्लॅट स्क्रीन मिळण्याची शक्यता आहे, ज्याचे वजन 206g आहे आणि त्याचे प्रोफाइल 8.43mm आहे.
पोस्टखाली दिलेल्या टिप्पणीत, टिपस्टरने पुढे म्हटले आहे की Realme GT 7 एप्रिल महिन्यात चीनमध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, जुलै 2024 मध्ये चीनमध्ये सादर करण्यात आलेला सध्याचा Realme GT 6 हँडसेट मायक्रो-कर्व्हड डिस्प्लेसह येतो. यात Snapdragon 8 Gen 3 SoC आणि 120W चार्जिंग सपोर्टसह 5,800mAh बॅटरी आहे.
tipster Smart Pikachu च्या Weibo वरील दाव्यानुसार, Realme GT 8 Pro मध्ये अजूनही जाहीर न झालेली Snapdragon 8 Elite 2 chipset आहे. यामध्ये flat OLED screen असू शकते तर 2K resolution आणि 7,000mAh battery चा समावेश आहे.
biometric authentication साठी Realme GT 8 Pro मध्ये अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेन्सर असण्याची शक्यता आहे. कॅमेराचा विचार केला तर , त्यात periscope telephoto shooterचा समावेश असल्याचे म्हटले जाते. हँडसेटची इतर अपेक्षित माहिती किंवा त्याच्या संभाव्य लाँच टाइमलाइन बद्दल अद्याप माहित नाही.
जाहिरात
जाहिरात