GT 8 Pro मध्ये 50 मेगापिक्सेल मेन सेन्सर, 50 मेगापिक्सेल अल्ट्रावाईड आणि 200 मेगा पिक्सेल टेलिफोटो आहे.
Photo Credit: Realme
Realme GT 8 Pro मध्ये रिको जीआर-ट्यून केलेला रियर कॅमेरा युनिट आहे
Realme कडून GT 8 series चीन मध्ये 21 ऑक्टोबर दिवशी समोर आणली आहे. ज्यामध्ये flagship GT 8 Pro आणि standard GT 8 चा समावेश आहे. कंपनीने नोव्हेंबरमध्ये Realme GT 8 Pro भारतात लाँच करण्याची माहिती दिली आहे, परंतु त्याची नेमकी लाँच तारीख मात्र गुलदस्त्यामध्ये आहे. एका टिपस्टरने भारतात Realme GT 8 Pro लाँच होण्याची संभाव्य तारखेचा अंदाज वर्तवला आहे. tipster Yogesh Brar ने X, वर दिलेल्या माहितीनुसार हा फोन 20 नोव्हेंबरला लॉन्च होण्याचा अंदाज आहे. यापूर्वी, दोन खास मायक्रोसाईट्स लाईव्ह झाल्या होत्या, एक Realme च्या ऑनलाइन स्टोरीवर आणि दुसरी Flipkart वर, जी पुष्टी करते की GT 8 Pro या चॅनेलद्वारे उपलब्ध असेल.
Realme GT 8 Pro चा इंडियन व्हेरिएंट Snapdragon 8 Elite Gen 5 प्रोसेसर सह येणार आहे. हा स्मार्टफोन HyperVision AI chip सोबत जोडलेला आहे. यात फोनच्या चीन व्हर्जन प्रमाणेच Ricoh GR-powered triple rear camera असण्याचा अंदाज आहे. ज्यामध्ये 50 मेगापिक्सेल मेन सेन्सर, 50 मेगापिक्सेल अल्ट्रावाईड आणि 200 मेगा पिक्सेल टेलिफोटो आहे. 32MP selfie camera देखील आहे.
GT 8 Pro चे एक वेगळे फीचर म्हणजे त्यात कस्टमायझ करण्यायोग्य लूकसाठी अदलाबदल करण्यायोग्य कॅमेरा हाऊसिंग आहे ज्यामध्ये Realme यूजर्सना चौरस, गोल आणि रोबोट स्टाईल कॅमेरा आयलंडचा पर्याय देते.
GT 8 Pro मधील डिस्प्ले 6.79-इंचाचा QHD+ flexible Amoled panel सह आहे जो 7,000 nits पीक ब्राइटनेस, 144Hz कमाल रिफ्रेश रेट आणि 3,200Hz टच सॅम्पलिंग रेट सह येतो. GT 8 Pro मध्ये 7,000mAh बॅटरी आहे, ज्यामध्ये 120W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. प्रो मॉडेलमध्ये धूळ आणि पाण्यापासून फोन सुरक्षित असेल कारण त्याला IP66, IP68 आणि IP69 रेटिंग देखील आहे.
व्हेरियंट किंमत (CNY) अंदाजे भारतीय किंमत
12GB + 256GB CNY 3,999 रू. 50,000
16GB + 256GB CNY 4,299 रू. 53,600
12GB + 512GB CNY 4,499 रू. 56,000
16GB + 512GB CNY 4,699 रू. 58,600
16GB + 1TB CNY 5,199 रू. 64,800
जाहिरात
जाहिरात