Realme GT 8 Pro मध्ये Modular rear camera system असणार यूजर्सना Ricoh-निर्मित पर्यायांसह कॅमेरा आयलंडच्या डिझाइनची अदलाबदल करण्याची परवानगी मिळते.
Photo Credit: Realme
Realme GT 8 Pro मध्ये Snapdragon 8 Elite Gen 5, 16GB RAM, 512GB स्टोरेज आहे
Realme कडून आता बाजारात त्यांचा फ्लॅगशीप स्मार्टफोन GT 8 Pro बाजारात लॉन्च करण्याची तयारी सुरू आहे. येत्या काही आठवड्यातच तो येईल, मात्र या लॉन्चपूर्वी रिअल मी कडून एका पार्टनरशीपची माहिती देण्यात आली आहे. रिअलमी ने जॅपनीज कॅमेरा कंपनी Ricoh सोबत हातमिळवणी केली आहे त्यामुळे या फोनमध्ये कॅमेरा अपग्रेड मिळणार आहे. GT 8 Pro मध्ये Modular rear camera system असणार आहे. यामुळे यूजर्सना Ricoh-निर्मित पर्यायांसह कॅमेरा आयलंडच्या डिझाइनची अदलाबदल करण्याची परवानगी मिळते. Realme GT 8 Pro बाजारात नेमका कधी लॉन्च होईल? याची ठोस माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. मात्र तत्पूर्वी या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स, किंमत, लॉन्च टाईमलाईन याबाबतचे अपडेट्स तुम्ही नक्की जाणून घ्या.
Realme GT 8 Pro मध्ये 2K 10-bit LTPO BOE flat OLED display असण्याचा अंदाज आहे. सोबत 144Hz refresh rate आहे. त्यामध्ये Snapdragon 8 Elite Gen 5 चीपसेटचा समावेश असणार आहे. ही चीपसेट 16GB RAM आणि 512GB storage सोबत जोडलेली आहे. दरम्यान या फोनमध्ये 7,000 mAh क्षमतेची बॅटरी आहे. 120W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. फोनला IP69 सपोर्ट असल्याने तो धूळ, पाण्यापासून सुरक्षित आहे. फोनमध्ये in-display fingerprint sensor देखील आहे.
Realme GT 8 Pro चा कॅमेरा पाहता तो 200MP periscope camera, 50MP primary Sony sensor with OIS येण्याचा अंदाज आहे. यामध्ये 50MP ultrawide sensor आहे. Ricoh चा GR Mode फास्ट-स्टार्ट इंटरफेस, जीआर शटर साउंड, प्रीसेट स्नॅप मोड फोकस पर्याय आणि ड्युअल फोकल लेंथ (वाइड शॉट्ससाठी 28mm आणि क्लोजर डिटेल्ससाठी 40mm ) देईल. या अपडेटमध्येcustomisable options सह स्टँडर्ड, पॉझिटिव्ह फिल्म, निगेटिव्ह फिल्म, मोनोटोन आणि हाय-कॉन्ट्रास्ट ब्लू अँड डब्ल्यू यासह पाच क्लासिक Ricoh GR color tones देखी Realme GT 8 Pro, ल आहेत.
Realme GT 8 Pro हा 10 ते 12 नोव्हेंबर दरम्यान लॉन्च होण्याचा अंदाज आहे. अद्याप निश्चित तारीख कंपनीकडून जाहीर करण्यात आलेली नाही. तर भारतात या फोनची किंमत 65 हजारांच्या आसपास असण्याचा अंदाज आहे
जाहिरात
जाहिरात