Realme GT 8 Pro आणि Realme GT 8 मध्ये Ricoh ट्यून केलेला रियर-कॅमेरा युनिट असण्याची खात्रीशीर माहिती आहे.
Photo Credit: Realme
Realme GT 8 किंमत Rs 42,999; GT 8 Pro किंमत Rs 62,999 पासून
चायनीज स्मार्टफोन कंपनी Realme त्यांची Realme GT 8 series 21 ऑक्टोबर दिवशी लॉन्च करण्याच्या तयारीमध्ये असल्याची माहिती सोशल मीडीया चॅनेलद्वारा देण्यात आली आहे. आगामी लाईनअप मध्ये दोन मॉडेल्सचा समावेश करण्यात आला आहे. त्यात Realme GT 8 आणि Realme GT 8 Pro चा समावेश आहे. दरम्यान या स्मार्टफोन कंपनीकडून Ricohसोबतही advanced image tuning साठी पार्टनरशीप केली आहे. म्हणजेच GT 8 series ही या स्मार्टफोनची पहिली सीरीज आहे ज्यामध्ये Ricoh GR imaging technology चा समावेश करण्यात आला आहे. फोनच्या किंमतीपासून, डिझाईन आणि परफॉर्ममन्स, कॅमेरा तपशील पहा काय सांगतात.
Realme GT 8 Pro हा Qualcomm च्या फ्लॅगशीप Snapdragon 8 Elite Gen 5 chipset वर चालणार आहे. त्यामध्ये 2K 10-bit LTPO BOE flat OLED panel असून 144Hz refresh rate आहे. फोटोग्राफीसाठी GT 8 Pro मध्ये 200-megapixel Samsung HP5 periscope telephoto lens आहे. लीक्सच्या माहितीनुसार, Samsung HP5 periscope telephoto lens असण्याचा अंदाज आहे. तर 50-megapixel Samsung JN5 ultrawide camera असल्याने हा फोन तीन interchangeable camera modules सह येणार आहे. ज्यात फोकल लेन्थ आणि शूटिंग स्टाईल्स बदलता येऊ शकतात. या फोनमध्ये 7,000mAh battery, 120W fast charging सपोर्ट असण्याचा अंदाज आहे.
Standard Realme GT 8 मध्ये Snapdragon 8 Elite chipset असण्याचा अंदाज आहे. यामध्ये 6.6-inch 1.5K OLED display आहे. 144Hz refresh rate आहे. सोबत 50-megapixel Sony LYT-808 primary camera चा समावेश आहे8-मेगापिक्सेल अल्ट्रावाइड, 50-मेगापिक्सेल टेलिफोटो सेटअपवर समाधान मानू शकते. Geekbench वर स्टँडर्ड Realme GT 8 दिसल्याचे वृत्त आहे, जो Android 16 आणि 16GB रॅमवर चालत असल्याची माहिती समोर आली आहे.
Realme GT 8 series चे चीन मध्ये 21 ऑक्टोबर दिवशी दुपारी 3 च्या सुमारास (12:30 pm IST) ला लॉन्चिंग होणार आहे. दरम्यान भारतात हा फोन नोव्हेंबर महिन्याच्या दुसर्या आठवड्यात येण्याचा अंदाज आहे. फोनची किंमत पाहता Realme GT 8 ची किंमत Rs 42,999 आहे तर GT 8 Pro ची किंमत Rs 62,999 पासून सुरू होण्याचा अंदाज आहे.
जाहिरात
जाहिरात