Photo Credit: Realme
Realme Narzo 70 Turbo 5G (चित्र) सप्टेंबरमध्ये भारतात लॉन्च करण्यात आला
Realme Narzo 80 Ultra भारतामध्ये पुढील वर्षी लॉन्च होण्याच्या तयारीत आहे. नव्या रिपोर्ट्सनुसार, हा फोन Narzo series मधील पहिला Ultra-branded model आहे. Narzo 80 Ultra ची लॉन्च टाईमलाईन आणि स्टोरेज क्षमता यांची माहिती लीक झाली आहे. मागील काही आठवड्यांमध्ये Realme Narzo 70 Curve हा हॅन्डसेट देखील लॉन्च साठी सज्ज असल्याची माहिती समोर आली आहे. चायनीज स्मार्टफोन कंपनी कडून आज भारतामध्ये Realme 14xलॉन्च होणार असल्याची माहिती दिली आहे.
Realme Narzo 80 Ultra हा स्मार्टफोन RMX5033 या मॉडेल नंबर सह लॉन्च होण्याचा अंदाज आहे. 91Mobiles च्या रिपोर्ट्सनुसार, हा फोन लवकरच भारतामध्ये लॉन्च होणार आहे. हा स्मार्टफोन "Narzo Ultra" चं पहिलं मॉडेल म्ह्हणून लॉन्च होण्याचा अंदाज आहे. हा फोन जानेवारी 2025 च्या शेवटापर्यंत लॉन्च होऊ शकतो.
Realme Narzo 80 Ultra हा स्मार्टफोन हमखास "white gold" रंगामध्ये लॉन्च होणार आहे. या फोनमध्ये 8GB RAM आणि 128GB storage चा पर्याय आहे. पण हा स्मार्टफोन अन्य रॅम आणि स्टोरेज कॉन्फ्युगरेशन मध्येही लॉन्च होण्याचा अंदाज आहे.
अन्य रिपोर्ट्स नुसार, स्मार्टफोन model number RMX5030 हा Realme P3 Ultra लॉन्च होणार आहे. हा फोन भारतामध्ये जानेवारी 2025 मध्ये लॉन्च होण्याचा अंदाज आहे. या फोनमध्ये 12GB of RAM आणि 256GB of onboard storage चा पर्याय आहे. Realme P2 Pro 5G हा स्मार्टफोन भारतामध्ये सप्टेंबर मध्ये लॉन्च झाला होता. तेव्हा त्याची किंमत Rs. 21,999 ही 8GB + 128GB पर्यायासाठी होती.
Realme Narzo 70 Curve हा स्मार्टफोन model number RMX3990 सह डिसेंबर महिन्याच्या अखेर पर्यंत लॉन्च होण्याचा अंदाज होता. मात्र अजूनही या फोनबद्दल कंपनीकडून माहिती देण्यात आलेली नाही. आता आगामी वर्षात 2025 मध्ये हा फोन लॉन्च होऊ शकतो.
जाहिरात
जाहिरात