Photo Credit: Realme
Realme Neo 7 चीन मध्ये लॉन्च झाला आहे. हा कंपनीच्या Neo series मधील लेटेस्ट मॉडेल आहे. नवा Realme phone हा MediaTek Dimensity 9300+ chipset वर चालतो. फोनमध्ये ड्युअल रेअर कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये 50 megapixel main sensor आहे. Realme Neo 7 हा Realme GT Neo 6 च्या पुढील फोन आहे. या फोनमध्ये 7,000mAh battery आहे तर 80W fast charging support आहे. हा फोन तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे. Realme Neo 7 मध्ये IP68 आणि IP69 रेटिंग आहे. त्यामुळे फोनचे धूळ आणि पाण्यापासून रक्षण होते.
Realme Neo 7 हा फोन CNY 2,099 म्हणजे अंदाजे 24 हजार रूपयांना 12GB + 256GB RAM आणि storage व्हेरिएंट साठी उपलब्ध आहे. तर 12GB + 512GB, 16GB + 512GB, आणि 16GB + 1TB व्हेरिएंट्स हे CNY 2,499, CNY 2,799 आणि CNY 3,299 मध्ये उपलब्ध आहेत. म्हणजेच भारतीय रूपयांमध्ये यांची किंमत 29,000 , 32,000 आणि 38,000 रूपये आहे. दरम्यान 16GB + 256GB व्हेरिएंटची किंमत CNY 2299 अर्थात 26,000 रूपये आहे. हा फोन Meteorite Black, Starship,आणि Submersible रंगांमध्ये उपलब्ध आहे.
Realme Neo 7 मध्ये ड्युअल सीम आहे. दोन्ही नॅनो सीम्स आहेत. Realme Neo 7 हा Realme UI 6.0 बेस्ड Android 15 वर चालतो. यामध्ये 6.78-inch 1.5K(1,264x,2,780 pixels) 8T LTPO डिस्प्ले आहे. दरम्यान 6,000 nits peak brightness आहे. 2,600Hz touch sampling rate,आणि 93.9 % स्क्रीन टू बॉडी रेशो आहे. हा स्मार्टफोन octa-core MediaTek Dimensity 9300+ chipset वर चालतो. त्यामध्ये 16GB RAM आणि कमाल 1TB storage आहे. दरम्यान या हॅन्डसेट मध्ये 12GB व्हर्च्युअल रॅम आहे.
Realme Neo 7 मध्ये ड्युअल रेअर कॅमेरा युनिट आहे. तर 50-megapixel Sony IMX882 camera हा OIS support सह आहे. 8-megapixel secondary wide-angle camera आहे. सेल्फीसाठी फोनला 16-megapixel front cameraआहे. या फोनमध्ये Sky Communication System 2.0 feature आहे.
कनेक्टिव्हिटीसाठी Realme Neo 7 मध्ये 5G, Beidou, Bluetooth 5.4, GPS, Galileo, GLONASS, QZSS, NavIC, NFC, Wi-Fi 802.11 a/b/g/n/ac/ax/be आहे. ऑनबोर्ड असलेले सेन्सर्स हे accelerometer, colour temperature sensor, distance sensor, light sensor, geomagnetic sensor gyroscope sensor, infrared remote control आणि under-screen fingerprint sensor सह आहेत. या फोनमध्ये ड्युअल स्पीकर्स आहेत. OReality audio sound support आणि Hi-Res audio certification आहे.
जाहिरात
जाहिरात