Photo Credit: Realme
Realme Neo 7 चीन मध्ये डिसेंबर महिन्यात लॉन्च होण्याच्या तयारी मध्ये आहे. पण अद्याप ठोस लॉन्च डेट जाहीर करण्यात आलेली नाही. या फोनच्या लॉन्चच्या पूर्वी फोनची किंमत, बॅटरी आणि फोनच्या अन्य अपडेट्स बद्दल माहिती देणार आहे. या फोनमध्ये MediaTek Dimensity 9300+ chipset असणार आहे. तर बॅटरी 7,000mAh असणार आहे. Realme Neo 7 हा Realme GT Neo 6 आणि GT Neo 6 SE च्या पुढचा फोन असणार आहे.Realme Neo 7 ची किंमत आणि अन्य अपडेट्स घ्या जाणून.Realme Neo 7 ची किंमत चीन मध्ये CNY 2,499 म्हणजे भारतीय रूपयामाध्ये 29,100 आहे असे कंपनीने Weibo post मध्ये सांगितले आहे. या फोनला AnTuTu score हा 2 मिलियन पॉईंट्स पेक्षा अधिक आहे. या पोस्ट मधील अन्य माहितीनुसार फोनची बॅटरी ही 6,500mAh पेक्षा जास्त असणार आहे. फोनला IP68 पेक्षा जास्त रेटिंग असल्याने फोन धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित असणार आहे.
Realme च्या Neo 7 साठी प्री रिझव्हेशन सुरू झाला आहे. हा फोन Realme China e-store आणि ई कॉमर्स वेबसाईट वर उपलब्ध असणार आहे. आता हळूहळू या फोनचे तपशील येत्या काही दिवसांत मिळणार आहेत.
Realme Neo 7 च्या यापूर्वी लीक झालेल्या दाव्यानुसार, फोनला AnTuTu score हा 2.4 मिलियन पेक्षा अधिक आहे. यामध्ये MediaTek Dimensity 9300+ chipset असण्याचा अंदाज आहे. तर फोनमध्ये 7,000mAh battery असणार आहे. फोनचे धुळ आणि पाण्यापासून रक्षण करण्यासाठी IP68 आणि IP69 रेटिंग्स असणार आहे.
चीनच्या 3C certification वरील लिस्टिंगनुसार, Realme Neo 7 च्या लॉन्चच्या वेळेस 80W wired SuperVOOC charging आहे. या हॅन्डसेट मध्ये 1.5K resolution display आहे.
सध्याच्या Realme GT Neo 6 मध्ये napdragon 8s Gen 3 SoC आहे तर 5,500mAh बॅटरी आहे. 120W charging support असणार आहे. फोनमध्ये 6.78-inch 1.5K 8T LTPO AMOLED screen असणार आहे. या फोनची किंमत CNY 2,099 आहे. भारतीय रूपयांमध्ये तो 22 हजार आहे. चीन मध्ये ही किंमत 12GB + 256GB व्हेरिएंट साठी आहे.
जाहिरात
जाहिरात