लीक्समधील माहितीवर विश्वास ठेवल्यास त्यामध्ये 6.78-inch flat OLED screen सोबत 1.5K resolution चा समावेश असेल.
Photo Credit: Realme
नवीन फोनमध्ये Snapdragon 8 Gen 5 प्रोसेसर मिळू शकतो
वर्षभरापूर्वी Realme Neo 7 बाजरात आल्यानंतर आता या फोनच्या पुढील फोनची तयारी सुरू असल्याची चर्चा आहे. टीप्ससटर Digital Chat Station च्या माहितीनुसार, Neo 8 हा आगामी स्मार्टफोन बाजरात येण्याची शक्यता आहे. लीक्समधील माहितीवर विश्वास ठेवल्यास त्यामध्ये 6.78-inch flat OLED screen सोबत 1.5K resolution चा समावेश असेल. यासोबत फोनमध्ये ultrasonic in-display fingerprint scanner असण्याचा देखील अंदाज आहे.Realme च्या आगामी या फोनमध्ये Snapdragon 8 Gen 5 चीपसेटचा समावेश असू शकतो. त्यासोबतच दमदार silicon-based battery देखील असू शकते, जी सुमारे 8,000mAh ची असू शकते. फोनमधील कॅमेरा पाहता त्यामध्ये 50MP main sensor असू शकतो. या फोनमध्येही realme UI 7 interface असेल जे Android 16 वर बेस्ड असणार आहे. मात्र लीक्स मध्ये त्याची पुष्टी करण्यात आलेली नाही. Neo 7 मध्ये 7,000mAh बॅटरी होती जी 80W जलद चार्जिंगला सपोर्ट करते, 20 तासांपेक्षा जास्त व्हिडिओ प्लेबॅक देण्याचा दावा केला जातो.
Neo 8 हा डिसेंबर 2024 मध्ये रिलीज झालेल्या Dimensity 9300 Plus पॉवर्ड Realme Neo 7 ची जागा घेईल. या उदाहरणावरून येत्या महिन्यात नवीन मॉडेल बाजारात येऊ शकते अशी माहिती देखील समोर येत आहे. Neo 8 सीरीजमध्ये Dimensity 8500 चिपसेटद्वारे सपोर्टेड एक प्रकार समाविष्ट असण्याची अफवा आहे, ज्याचे नाव Realme Neo 8 SE असे असू शकते, ज्याची लॉन्च विंडो 2026 च्या पहिल्या तिमाहीत येईल.
वेगवेगळ्या लाँचिंग कार्यक्रमांमध्ये, Realme जागतिक बाजारपेठेत Realme GT 8 Pro सादर करत आहे. हा फोन 20 नोव्हेंबर रोजी भारतात लाँच होणार आहे आणि त्यानंतर 24 नोव्हेंबर रोजी युरोपमध्ये लाँच होणार आहे.
आता लवकरच बाजारात लॉन्च होणार्या मोबाईल फोन्सची यादी समोर आली आहे ज्यामध्ये Snapdragon 8 Gen 5 processor चा सपोर्ट असू शकतो. यामध्ये OnePlus Ace 6T, Vivo S50 Pro Mini, Moto X70 Ultra आणि OPPO K13 Turbo Pro सारखे स्मार्टफोन समाविष्ट आहेत. आता, Realme Neo 8 देखील या यादीत जोडला गेला आहे. अंदाजानुसार, Snapdragon 8 Gen 5 फ्लॅगशिप फोन 50 हजार रुपयांपर्यंतच्या बजेटमध्ये लाँच केले जाऊ शकतात. चीन मध्ये हा Realme Neo 8 स्मार्टफोन डिसेंबर महिन्यात लॉन्च होऊ शकतो
जाहिरात
जाहिरात