फ्लिपकार्टच्या Product Page नुसार, ग्राहकांना फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड आणि फ्लिपकार्ट एसबीआय क्रेडिट कार्ड वापरून फोन खरेदी करताना ५ टक्क्यांपर्यंत कॅशबॅक मिळेल.
Photo Credit: Realme
Realme P3 Lite 5G लिली व्हाइट, पर्पल ब्लॉसम आणि मिडनाईट लिली रंगांमध्ये उपलब्ध असल्याची पुष्टी झाली आहे
Realme कडून P3 Lite 5G हा स्मार्टफोन सप्टेंबर 13 दिवशी भारतामध्ये लॉन्च होण्याचा अंदाज आहे. भारतात सध्या त्याची किंमत Flipkart listing च्या माध्यमातून समोर आली आहे. या फोनमध्ये MediaTek Dimensity 6300 5G chipset चा समावेश आहे तर फोनमध्ये 6,000mAh battery आहे आणि 45W fast charging आहे. फोनमध्ये 6.67-inch display, 32MP rear camera आणि 8MP selfie shooter आहे. हा फोन बाजरात तीन रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे. हा फीचर्स समृद्ध बजेट 5G phone असणार आहे.
Flipkart ने 13 सप्टेंबर रोजी लॉन्च होणाऱ्या आगामी Realme P3 Lite 5G ची यादी दिली आहे, ज्यामध्ये त्याची भारतातील किंमत आणि व्हेरिएंट्सची माहिती देण्यात आली आहे. 4 GB RAM + 128GB storage model हे या फोनचे बेस मॉडेल आहे. त्याची किंमत Rs. 12,999 असेल, तर 6 GB RAM + 128GB storage पर्यायाची किंमत Rs. 13,999 आहे. या यादीत डिव्हाइसची दोन कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्धता असल्याचे सिद्ध झाले आहे, ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या कामगिरीच्या गरजेनुसार निवड करण्याची संधी मिळते.
Realme P3 Lite 5G हा स्मार्टफोन Lily White, Purple Blossom, आणि Midnight Lily या रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे. Realme UI 6.0 हा Android 15 वर अवलंबून आहे. फोनमध्ये 6.67-inch HD+ display (720×1,604 pixels) आहे. फोनमध्ये 625 nits peak brightness आहे त्यामुळे या फोनचा अनुभव अत्यंत सहज सोपा आणि ब्राईट असणार आहे.
octa-core MediaTek Dimensity 6300 chipset द्वारे फोनला सपोर्ट असणार आहे. कॅमेरा हायलाइट्समध्ये 32MP रियर युनिट आणि 8MP सेल्फी कॅमेरा समाविष्ट आहे, तर IP64-रेटेड बिल्डसह टिकाऊपणा सुनिश्चित आहे. फोनमध्ये 45W फास्ट चार्जिंग आणि 5W रिव्हर्स चार्जिंगसह मोठी 6,000mAh बॅटरी आहे. हा स्मार्टफोन 7.94mm स्लिम बॉडीमध्ये आहे.
फ्लिपकार्टच्या Product Page नुसार, ग्राहकांना फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड आणि फ्लिपकार्ट एसबीआय क्रेडिट कार्ड वापरून फोन खरेदी करताना ५ टक्क्यांपर्यंत कॅशबॅक मिळेल. त्यावर ‘coming soon' असे टॅग दाखवले आहे आणि कंपनी13 सप्टेंबर दिवशी हँडसेट लाँच करताना विक्रीची तारीख जाहीर करेल अशी अपेक्षा आहे.
जाहिरात
जाहिरात