Photo Credit: Realme
Realme P3 5G मध्ये IP69-रेटेड डस्ट आणि वॉटर रेझिस्टन्स आहे.
Realme P3 Ultra 5G भारतामध्ये बुधवारी Realme P3 5G सोबत समोर आला आहे. अल्ट्रा मॉडेल मध्ये MediaTek Dimensity 8350 Ultra SoC चा सपोर्ट आहे. मोबाईलचं बेस मॉडेल Snapdragon 6 Gen 4 chipset सह येते. दोन्ही स्मार्टफोन मध्ये 6,000mAh batteries आहेत. Ultra variant मध्ये 80W AI bypass charging technology चा सपोर्ट आहे. Realme P3 Ultra हा Glow-in-the-dark rear panel सह येतो. यामध्ये स्टारलाईट इंक चा प्रोसेसचा वापर करण्यात आला आहे. आजपासून त्याच्या विक्रीला सुरूवात होत आहे.
भारतामध्ये Realme P3 Ultra 5G हा स्मार्टफोन Rs. 26,999 पासून सुरू होतो. त्याचे व्हेरिएंट 8GB + 128GB आहे. यासोबतच फोन 8GB + 256GB आणि 12GB + 256GB मध्येही उपलब्ध आहे. त्याच्या किंमती Rs. 27,999 and Rs. 29,999 आहेत. हा फोन Neptune Blue आणि Orion Red रंगामध्ये उपलब्ध आहे. या फोनच्या मागे vegan leather finish आहे. glow-in-the-dark lunar डिझाईनचा पर्याय आहे.
Realme P3 Ultra 5G चा बेस व्हेरिएंट Rs. 22,999 मध्ये खरेदी करता येणार आहे. यामध्ये 3 हजार रूपयांचे डिस्काऊंट उपलब्ध आहे तर एक्सचेंज ऑफर मध्ये 1000 रूपये कमी होणार आहेत. 25 मार्च ला दुपारी 12 वाजल्यापासून फोन विक्रीसाठी खुला होणार आहे. तर फोनची प्री-बुकिंग 19 मार्चला दुपारी 2 वाजल्यापासून सुरू झाली आहे.
Realme P3 5G ची भारतामधील किंमत 6GB + 128GB configuration साठी Rs. 16,999 आहे. हा फोन 8GB + 128GB आणि 8GB + 256GB व्हर्जन मध्येही उपलब्ध आहे. त्यांची किंमत अनुक्रमे Rs. 17,999 आणि Rs. 19,999 आहे. हा फोन Comet Grey, Nebula Pink, आणि Space Silver रंगांमध्ये उपलब्ध आहे. Realme P3 5G वर 2000 रूपयांची बॅंक ऑफर आहे. या फोनची विक्री 26 मार्चला दुपारी 12 पासून सुरू होणार आहे.
Realme P3 5G आणि P3 Ultra 5G हे स्मार्टफोन्स फ्लिपकार्ट, Realme India e-store आणि रिटेल स्टोअर्स मध्ये खरेदी करता येतील.
Realme P3 Ultra 5G हा 6.83-inch 1.5K quad-curved screen सह येतो. तर Realme P3 5G मध्ये 6.67-inch AMOLED display आहे. दोन्ही फोनमध्ये 16-megapixel selfie camera आहे.
जाहिरात
जाहिरात