Realme P4 5G आणि P4 Pro 5G या दोन्ही स्मार्टफोनची किंमत 30 हजारांच्या खाली असणार आहे. असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Photo Credit: Realme
Realme P4 मालिकेत ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असू शकतो
Realme कडून आगामी P4 series मधील फोनची स्पेसिफिकेशन्स समोर आली आहे. फ्लिपकार्टवर या स्मार्टफोन बाबतच्या स्पेसिफिकेशन्स सह हार्डवेअर फीचर्सची माहिती देण्यात आली आहे. Realme P4 series सध्या भारतामध्ये लॉन्च साठी सज्ज आहे. पुढील आठवड्यामध्ये हा स्मार्टफोन लॉन्च होणार आहे. Flipkart सह Realme च्या वेबसाईट वर हा फोन विक्रीसाठी ऑनलाईन माध्यमातून उपलब्ध असणार आहे. 20 ऑगस्टला दुपारी 12 वाजता हा फोन लॉन्च होणार असून फोन कंपनी कडून प्रोडक्ट लाईन अप सांगण्यात आला असून यामध्ये अद्याप Ultra model ची माहिती देण्यात आलेली नाही.
Realme P4 5G मध्ये MediaTek Dimensity 7400 Ultra 5G chipset चा समावेश आहे. Pixelworks chip देखील आहे. या स्मार्टफोन मध्ये 6.77-inch HyperGlow AMOLED display आहे. ती Full-HD+ resolution, HDR10+ support, आणि 144Hz refresh rate देणारी आहे. Realme P4 5G मध्ये 7,000mAh Titan battery चा समावेश असून 80W fast charging सपोर्ट आहे. कंपनीच्या माहितीनुसार, ते 11 तासांपर्यंत BGMI गेम खेळू शकतात आणि फक्त 25 मिनिटांत सुमारे 50% चार्ज होऊ शकतो. अतिरिक्त चार्जिंग फीचर्स मध्ये रिव्हर्स चार्जिंग, एआय स्मार्ट चार्जिंग आणि बायपास चार्जिंग सपोर्ट समाविष्ट आहे. उष्णता कार्यक्षमतेने मॅनेज करण्यासाठी, त्यात 7,000 sq mm एअरफ्लो व्हीसी कूलिंग सिस्टम समाविष्ट आहे.
Realme P4 Pro 5G हा Snapdragon 7 Gen 4 chipset आणि हायपरव्हिजन AI GPU वर चालेल. हे मॉडेल फक्त 7.68mm जाडीसह स्लिम असण्यासाठी डिझाइन केले आहे. हे स्टॅडर्ड व्हेरिएंटप्रमाणेच बॅटरी क्षमता आणि फस्ट चार्जिंग कॅपॅबलिटीज साठी आहे परंतु 10W रिव्हर्स चार्जिंगला देखील सपोर्ट करतात. प्रो मॉडेल 90FPS वर आठ तासांपेक्षा जास्त BGMI गेमप्लेचे आश्वासन देते. Realme P4 Pro 5G मध्ये 144Hz च्या रिफ्रेश रेटसह HypeGlow AMOLED 4D Curve+ डिस्प्ले आहे.
Realme P4 5G आणि P4 Pro 5G या दोन्ही स्मार्टफोनची किंमत 30 हजारांच्या खाली असणार आहे. Realme P4 Series Pricing Francis Wong, Head of Product Marketing यांच्या माहितीनुसार, रिअलमी त्यांच्या उत्पादनांच्या ऑफरिंगला सुलभ करण्यासाठी यावेळी अल्ट्रा मॉडेल लाँच करणे टाळू शकते.
जाहिरात
जाहिरात