कॅमेराचे अपडेट्स पाहता डिव्हाइसमध्ये 50MP प्रायमरी सेन्सर आणि 2MP सेकंडरी सेन्सर असू शकतो, तर फ्रंटमध्ये 8MP सेल्फी कॅमेरा असेल.
Photo Credit: Realme
Realme P4x 5G मध्ये AI-आधारित 50-मेगापिक्सेल रियर कॅमेरा युनिट असेल
Realme कडून Realme P4x 5G हा फोन भारतामध्ये 4 डिसेंबरला लॉन्च करण्याची तयारी सुरू केली आहे. या फोनच्या किंमतीबद्दल फोनच्या अधिकृत लॉन्चपूर्वी माहिती समोर येण्यास सुरूवात झाली आहे. कंपनीने Flipkart वरील प्रमोशनल माहितीद्वारे आधीच महत्त्वाचे स्पेसिफिकेशन शेअर केले आहेत, तर आताच्या लीक्समध्ये सर्व स्टोरेज व्हेरिएंटसाठी अपेक्षित प्राईजिंग स्ट्रक्चर समोर आणले आहे.Realme P4x 5G चे लीक झालेले कॉन्फ्युगरेशन आणि भारतातील किंमत,टिपस्टर अभिषेक यादव यांच्या माहितीनुसार, Realme P4x 5G चा 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट 15,999 रुपयांपासून सुरू होईल. आणखी दोन व्हेरिएंट येण्याचा अंदाज आहे. 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 17,499 रुपये असण्याची शक्यता आहे आणि टॉप-एंड 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज पर्यायाची किंमत 19,499 रुपये असू शकते. या अपडेट्सवरून असे दिसून येते की Realme P4x 5G मिड-रेंज सेगमेंटमध्ये असू शकतो. ज्यामध्ये वेगवेगळ्या यूजर्सच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक कॉन्फिगरेशन आहेत.
Realme P4x 5G भारतात 4 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता (IST) लाँच होईल. त्यानंतर, P4x 5G फ्लिपकार्ट आणि Realme च्या अधिकृत वेबसाइटवरून खरेदीसाठी उपलब्ध असेल. Realme देखील याच कार्यक्रमात Realme Watch 5 लॉन्च करण्याचा अंदाज आहे.
Realme P4x 5G मध्ये 144Hz LCD डिस्प्ले असण्याची शक्यता आहे जो 1,000 nits पीक ब्राइटनेसपर्यंत पोहोचू शकतो. Realme च्या माहितीनुसार, हा स्मार्टफोन 90fps गेमिंगला सपोर्ट करेल, जे सपोर्टेड टायटल्समध्ये स्मूथ मोशन देऊ शकते. कॅमेराचे अपडेट्स पाहता डिव्हाइसमध्ये 50MP प्रायमरी सेन्सर आणि 2MP सेकंडरी सेन्सर असू शकतो, तर फ्रंटमध्ये 8MP सेल्फी कॅमेरा असेल. या स्मार्टफोनच्या अंतर्गत, Realme P4x 5G मध्ये MediaTek Dimensity 7400-Ultra चिपसेट असेल. ब्रँडच्या माहितीनुसार हा प्रोसेसर AnTuTu चाचणीमध्ये 780,000 पेक्षा जास्त गुण मिळवेल. यात 5300mm² VC कूलिंग सिस्टम देखील असेल, ज्याचा उद्देश थर्मल स्थिरता राखणे आहे, विशेषतः जास्त गेमिंग करणार्यांना त्याचा फायदा होईल. या डिव्हाइसला 7000mAh सिलिकॉन-कार्बन बॅटरीची पॉवर आहे, जी एका चार्जवर वापरासाठी डिझाइन केलेली आहे. शिवाय, या फोनमध्ये 8GB पर्यंत RAM आणि 256GB UFS 3.1 स्टोरेज असेल, तसेच 10GB पर्यंत व्हर्च्युअल रॅम वाढवण्यासाठी सपोर्ट असेल. हे 45W वायर्ड फास्ट चार्जिंगला देखील सपोर्ट करेल.
जाहिरात
जाहिरात