भारतात Realme 15 Pro 5G Game of Thrones Limited Edition कधी येणार याची माहिती अद्याप कंपनीकडून देण्यात आलेली नाही.
Photo Credit: Realme
Realme 15 Pro 5G गेम ऑफ थ्रोन्स एडिशन समान वैशिष्ट्यांसह येऊ शकते
Realme 15 Pro 5G Game of Thrones Limited Edition लवकरच भारतामध्ये दाखल होणार आहे. या आगामी फोनचा टीझर मोबाईल कंपनीकडून जारी करण्यात आला आहे. दरम्यान यावेळी फोनबाबतचे अन्य कोणतेही तपशील समोर आलेले नाहीत. The Realme 15 Pro 5G हा स्मार्टफोन भारतात या वर्षाच्या सुरूवातीला लॉन्च करण्यात आला होता. हा फोन 3 रंगांमध्ये तर 4 स्टोरेज ऑप्शन मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. दरम्यान टेक कंपनी आगामी स्पेशल एडिशन फोन नवीन रंगात बाजारात आणू शकते, परंतु त्याच वेळी त्याचे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स सारखेच असतील.Realme 15 Pro 5G Game of Thrones Limited Edition ची किंमत, उपलब्धतेबाबतचे अंदाजRealme या चीनी स्मार्टफोन कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ते लवकरच भारतात Realme 15 Pro 5G Game of Thrones Limited Edition लाँच करणार आहेत. आगामी स्मार्टफोनची किंमत आणि लाँच तारीख अद्याप जाहीर केलेली नाही.
जुलैमध्ये भारतात आलेल्या स्टॅडर्ड Realme 15 Pro 5G मॉडेलची किंमत 31,999 रुपये होती. बेस मॉडेल हे 8GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंट किंमतीसह 31,999 रुपयांचे होते. दुसरीकडे, टॉप-ऑफ-द-लाइन 8 GB रॅम + 256 GB स्टोरेज, 12 GB रॅम + 256 GB स्टोरेज आणि 12 GB रॅम + 512 GB स्टोरेज पर्याय अनुक्रमे 33,999 रुपये, 35,999 रुपये आणि 38,999 रुपयांना उपलब्ध होते. ते फ्लोइंग सिल्व्हर, वेल्वेट ग्रीन आणि सिल्क पर्पल रंगांमध्ये उपलब्ध आहे.
Realme 15 Pro 5G Game of Thrones Limited Edition मध्ये जुलै मॉडेलसारखीच फीचर्स असू शकतात. हा फोन 6.8 इंचाचा 1.5K (2800×1280 पिक्सेल) AMOLED स्क्रीनसह येतो, ज्याचा रिफ्रेश रेट 144Hz पर्यंत आहे, टच सॅम्पलिंग रेट 2,500Hz पर्यंत आहे. फ्रंट पॅनेलवर Corning Gorilla Glass 7i चे प्रोटेक्शन आहे.
फोनमध्ये Snapdragon 7 Gen 4 SoC आहे, जो 12GB LPDDR4X RAM आणि 512GB UFS 3.1 स्टोरेजपर्यंत समर्थित आहे. कॅमेऱ्यासाठी, मागील बाजूस 50 मेगापिक्सेल Sony IMX896 प्रायमरी कॅमेरा आणि 50 मेगापिक्सेल अल्ट्रावाइड लेंस आहे. समोर 50 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आहे.
जाहिरात
जाहिरात