भारतात Redmi 15 5G प्रिमियर फीचर्स सह लॉन्च; किंमत 14,999 पासून सुरू

Redmi 15 5G मध्ये 6.9-इंचाचा फुल HD+ LCD डिस्प्ले आहे ज्याचा 144Hz adaptive refresh rate आणि 288Hz touch sampling rate आहे.

भारतात Redmi 15 5G प्रिमियर फीचर्स सह लॉन्च; किंमत 14,999 पासून सुरू

Photo Credit: Xiaomi

रेडमी १५ ५जी फ्रॉस्टेड व्हाइट, मिडनाईट ब्लॅक आणि सँडी पर्पल रंगांमध्ये विकला जातो

महत्वाचे मुद्दे
  • Redmi 15 5G विक्री 28 ऑगस्टपासून Amazon आणि स्टोअर्सवर
  • Redmi 15 5G उपलब्ध Midnight Black, Frosted Black, Sandy Purple रंगांमध्ये
  • फोनमध्ये 50MP रियर, डेप्थ सेन्सर, 8MP सेल्फी कॅमेरा
जाहिरात

Xiaomi चा सब ब्रॅन्ड Redmi ने त्यांच्या मागील वर्षी लॉन्च झालेल्या Redmi 13 5G चा उत्तराधिकारी स्मार्टफोन आता बाजारात आणला आहे. रेडमी च्या या नव्या स्मार्टफोन मधील एक महत्त्वाचं आकर्षण म्हणजे त्यामधील 7,000 mAh बॅटरी. या स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 6s Gen 3 SoC, चा समावेश आहे, तर फोनमध्ये 50MP primary camera चा देखील समावेश आहे. फोटो एडिटिंग आणि अन्य काही वापरासाठी AI-powered tools चा समावेश करण्यात आलेला आहे. मग जाणून या Redmi 15 5G ची किंमत, उपलब्धता आणि अन्य फीचर्स

Redmi 15 5G ची किंमत काय?

Redmi 15 5G स्मार्टफोनची किंमत 6GB RAM + 128GB स्टोरेज असलेल्या बेस मॉडेलसाठी 14,999 रुपये आहे. दरम्यान, 8GB + 128GB आणि 8GB + 256GB व्हेरिएंट साठी ग्राहकांना 5,999 रुपये आणि 16,999 रूपये मोजावे लागणार आहेत. Redmi 15 5G हा स्मार्टफोन 28 ऑगस्ट दिवशी विक्रीसाठी खुला होणार आहे. हा स्मार्टफोन Amazon, Xiaomi India website आणि अन्य महत्त्वाच्या ऑफलाईन रिटेल स्टोअर्स वर विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. Redmi 15 5G हा स्मार्टफोन Midnight Black, Frosted Black आणि Sandy Purple या रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे.

Redmi 15 5G ची स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

Redmi 15 5G मध्ये 6.9-इंचाचा फुल HD+ LCD डिस्प्ले आहे ज्याचा 144Hz adaptive refresh rate आणि 288Hz touch sampling rate आहे. Redmi 15 5G मध्ये 700 nits आणि 850 nits चा सामान्य पीक ब्राइटनेस देतो. परफॉर्मन्सच्या बाबतीत, हा फोन 6nm process आधारित Qualcomm Snapdragon 6s Gen 3 processor आणि 8GB पर्यंत LPDDR4x रॅम आणि 256GB पर्यंत UFS 2.2 ऑनबोर्ड स्टोरेजसह येणार आहे.

Redmi 15 5G हा फोन Android 15 वर आधारित HyperOS 2.0 वर चालतो. यात दोन वर्षांचे प्रमुख OS अपग्रेड आणि 4 वर्षांचे सुरक्षा अपडेट्स मिळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये 50MP चा प्रायमरी रियर शूटर, डेप्थ सेन्सर आणि सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 8MP शूटर आहे. यात 33W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 18W रिव्हर्स वायर्ड चार्जिंगला सपोर्ट असलेली 7,000mAh ची सिलिकॉन-कार्बन बॅटरी आहे.

Redmi 15 5G मध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, धूळ आणि स्प्लॅश रोखण्यासाठी IP64 रेटिंग आणि IR ब्लास्टर आहे. कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये 5G, 4G, ब्लूटूथ, वाय-फाय, GPS आणि USB टाइप-सी पोर्ट समाविष्ट आहेत. फोनचे वजन 217 ग्रॅम आहे.

Comments
Gadgets 360 Staff
 ...अधिक
        
    
फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. एअरटेलने हटवला 249 चा रिचार्ज प्लॅन; 24 दिवसांची वैधतेचा होता हा प्लॅन
  2. भारतात Redmi 15 5G प्रिमियर फीचर्स सह लॉन्च; किंमत 14,999 पासून सुरू
  3. Honor X7c 5G भारतात अधिकृतपणे लॉन्च; पहा या पॉवरपॅक्ट फोन मधील दमदार फीचर्स
  4. Airtel ची ग्राहकांना खास भेट! 6 महिन्यांसाठी Apple Music Subscription मिळणार अगदी मोफत
  5. दमदार बॅटरी आणि AI फीचर्स हायलाइट सह Infinix Hot 60i 5G भारतात लॉन्च साठी सज्ज; पहा अपडेट्स
  6. दमदार कूलिंग सिस्टीम, फास्ट चार्जिंगसह भारतात 20 ऑगस्टला लॉन्च होणार Realme P4 Series
  7. iQOO 15 चे स्पेसिफिकेशन्स झाले लीक; किंमत, फीचर्स, लॉन्च डेट चे पहा अपडेट्स
  8. Vu Glo QLED TV 2025 Dolby Edition भारतात लाँच; किंमत व फीचर्स इथे घ्या जाणून
  9. Lava Blaze AMOLED 2 5G आला Dimensity 7060 SoC आणि प्रीमियम AMOLED डिस्प्लेसह सह भारतीय बाजारात
  10. गेमिंग-फ्रेंडली फीचर्स सह आले Oppo K13 Turbo, Turbo Pro; पहा स्पेसिफिकेशन्स
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »