Redmi 15C मध्ये प्लास्टिकच्या मागील बाजूस स्क्विरिकल कॅमेरा मॉड्यूल आणि समोर वॉटरड्रॉप स्टाईल नॉच आहे.
Photo Credit: Redmi
Redmi 15C भारतात 11 डिसेंबरपासून Amazon आणि Mi वर उपलब्ध
सप्टेंबरमध्ये निवडक जागतिक बाजारपेठांमध्ये पदार्पण केल्यानंतर, बुधवारी भारतात Redmi 15C 5G लाँच करण्यात आला. Xiaomi कडून Redmi 15C लाँच करून त्यांच्या बजेट-फ्रेंडली C-series ला नवीन रूप दिले आहे. हा स्मार्टफोन गेल्या वर्षी लाँच झालेल्या लोकप्रिय Redmi 14C चा उत्तराधिकारी आहे आणि डिस्प्ले आणि बॅटरी विभागात लक्षणीय सुधारणा आणतो. हा स्मार्टफोन 15,000 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या ब्रॅकेटमध्ये Realme P4x, Infinix Hot 60i आणि Oppo K13 सारख्या स्मार्टफोनशी स्पर्धा करेल.
Redmi 15C तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये मूनलाईट ब्लू, डस्क पर्पल आणि मिडनाईट ब्लॅक हे रंग उपलब्ध आहेत. हे डिव्हाइस 4GB+128GB, 6GB+128GB,8GB+128GB या व्हेरिएंट मध्ये असणार आहे. या फोनच्या बेस व्हेरिएंटची ( 6GB RAM/128GB) किंमत12,499 रूपये आहे. 6GB RAM/128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 13,999 रूपये आणि 8GB RAM/128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 15,499 रूपये आहे. हा फोन 11 डिसेंबरपासून Amazon, Mi.com आणि रिटेल आउटलेट्सवरून खरेदी करण्यासाठी उपलब्ध असेल.
ड्युअल-सिम (नॅनो + नॅनो) Redmi 15C 5G हा Android 15 वर आधारित HyperOS 2 वर चालतो.
Redmi 15C मध्ये प्लास्टिकच्या मागील बाजूस स्क्विरिकल कॅमेरा मॉड्यूल आणि समोर वॉटरड्रॉप स्टाईल नॉच आहे. या डिव्हाइसचे वजन 211 ग्रॅम आहे आणि मोठी बॅटरी असूनही त्याची जाडी 8.05mm आहे. हे धूळ आणि पाण्याच्या प्रतिकारासाठी IP64 रेटिंग, बाजूला माउंट केलेले फिंगरप्रिंट स्कॅनरसह येते आणि 3.5mm ऑडिओ जॅक देखील राखून ठेवते.सोबत IR Blaster, ambient light sensor, e-compass, and an accelerometer देखील आहे. Redmi 15C 5G वरील कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये 5G, 4G, Wi-Fi, Bluetooth 5.4, GPS आणि USB Type-C पोर्ट यांचा समावेश आहे. यात 33W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6,000mAh बॅटरी आहे.
Redmi 15C मध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 240Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 810 nits ची कमाल ब्राइटनेस असलेला6.9 इंचाचा एचडी+ डिस्प्ले आहे. फोनमध्ये लो ब्लू लाइट, फ्लिकर-फ्री आणि Circadian फ्रेंडली व्ह्यूइंगसाठी TÜV Rheinland certifications देखील आहेत. Redmi 15C 5G चा आकार 171.56 x 79.47 x 8.05mm आहे आणि वजन 211 ग्रॅम इतके आहे.
जाहिरात
जाहिरात
Supermoon and Geminid Meteor Shower 2025 Set to Peak Soon: How to See It