IMC 2024 मध्ये Redmi A4 5G ची दिसली पहिली झलक; पहा या स्मार्टफोन बद्दल अपडेट्स

IMC  2024 मध्ये  Redmi A4 5G ची दिसली पहिली झलक; पहा या स्मार्टफोन बद्दल अपडेट्स

Photo Credit: Redmi

Redmi A4 5G was showcased in two colour options

महत्वाचे मुद्दे
  • Redmi A4 5G लॉन्च डेट अद्याप जाहीर नाही
  • Redmi A4 5G दहा हजारपेक्षा स्वस्त दरात उपलब्ध होण्याची शक्यता
  • Snapdragon 4s Gen 2 chip सह येणारा हा पहिला स्मार्टफोन
जाहिरात

Redmi A4 5G ची सोमवारी भारतामध्ये झलक पहायला मिळाली आहे. Qualcomm च्या Snapdragon 4s Gen 2 chip सह आलेला हा पहिला एंट्री लेव्हल स्मार्टफोन आहे. हा हॅन्डसेट सध्या दिल्लीत सुरू असलेल्या वार्षिक India Mobile Congress (IMC) 2024 मध्ये पहिल्यांदा दिसला आहे. दहा हजार पेक्षा कमी रूपयांमध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या प्राईज सेंगमेंट मधील अन्य स्मार्टफोन सोबत त्याची तगडी स्पर्धा असणार आहे. भारतामध्ये हा इतक्या किफायतशीत दरात उपलब्ध असलेल्या 5जी फोनपैकी एक असणार आहे.

Redmi A4 5G ची भारतामधील किंमत काय?

Redmi A4 5G हा स्मार्टफोन भारतामध्ये 10 हजारपेक्षा कमी रूपयांमध्ये उपलब्ध असणार आहे. अशी माहिती आहे. कंपनीच्या माहितीनुसार, लवकरच हा फोन भारतात लॉन्च केला जाईल. पण त्याची तारीख अद्याप सांगण्यात आलेली नाही. हा फोन काळा आणि पांढरा अशा दोन रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे.

Redmi A4 5G कसा असेल?

Redmi A4 5G मध्ये काय स्पेसिफिकेशन असू शकतात याची माहिती देण्यात आलेली नाही. पण हा फोन Snapdragon 4s Gen 2 chip सह असेल अशी चर्चा आहे. या चीपसेट येणारा हा पहिला फोन आहे. या फोनमध्ये octa-core processor असणार आहे. Qualcomm's 4nm process technologyवापरली जात असल्याने हा स्मार्टफोन 2GHz च्या वेगाने चालणार आहे. Snapdragon 5G Modem-RF system मुळे फोनमध्ये 5G network connectivity असणार आहे. तर हा फोन 1Gbps डाऊनलोड स्पीड ला सपोर्ट करणारा आहे.

Snapdragon 4s Gen 2 chipset ही full-HD+ displays with a 90Hz refresh rate ला सपोर्ट करणारी आहे. Redmi A4 5G मध्यी ड्युअल रेअर कॅमेरा असू शकतो. असे त्याचं IMC 2024 मध्ये दाखवलेल्या झलक मधील डिझाईन नुसार दिसत आहे. अन्य फीचर्स पाहता Snapdragon 4s Gen 2 chip सोबत
dual-frequency GPS फोन मध्ये असू शकतात. NavIC satellite systems असतील. तसेच या फोनमध्ये dual-band Wi-Fi 5, Bluetooth 5.1,आणि NFC connectivity आहे. या फोन मध्ये प्रोसेसर USB 3.2 Gen 1 transfer speeds (5Gbps) ला सपोर्ट करणारा आहे तर UFS 3.1 स्टोरेज सपोर्ट आहे.

Comments
पुढील वाचा: Redmi A4 5G, Redmi A4 5G Price in India, Redmi
Gadgets 360 Staff The resident bot. If you email me, a human will respond. अधिक
फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी

जाहिरात

जाहिरात

© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »