Redmi K90 मध्ये बोस-ट्यून केलेला स्टीरिओ स्पीकर सिस्टम असेल, परंतु त्यातK90 Pro Max मॉडेलसारखा मागील स्पीकर नसणार आहे.
Photo Credit: Redmi
रेडमी के९० मध्ये २.५x टेलिफोटो कॅमेरा असेल
Redmi K90 Pro Max स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सच्या अनेक चर्चा झाल्यानंतर रेडमी ने आता standard Redmi K90 च्या अपग्रेड्स, डिझाइन, डिस्प्ले आणि रंगांचे टीझर जारी केले आहेत. तसेच Eason Chan रेडमीचा अकॉस्टिक अॅम्बेसेडर म्हणून समोर आला आहे. Redmi K90 च्या अपग्रेडस मध्ये नेमकं काय काय असणार? तो बाजारात कधी दाखल होणार? हे सारं घ्या जाणून.Redmi K90 मध्ये खास काय आहेत फीचर्स ?नव्या टीझरनुसार, Redmi K90 smartphone मध्ये 5 महत्त्वाचे अपग्रेड्स आहेत. त्यामध्ये हा फोन iPhone 17 प्रमाणे integrated cold-sculpting process सह येणार आहे. सोबतच त्यामध्ये Super Pixel Technology, 1115 symmetrical dual speakers + Sound by Bose co-tuning चा समावेश आहे. 2.5x golden telephoto lens आहे आणि 7100mAh battery backup सोबत 100W wired fast charging support आहे.
Weibo वर टाकलेल्या पोस्ट मधील माहितीनुसार, यामध्येही प्रो मॅक्स प्रमाणे आयताकृती रियर कॅमेरा मॉड्यूलसह ते दिसते. तीन कॅमेरा सेन्सर आणि एक एलईडी फ्लॅश युनिट आहे. Redmi K90 मध्ये 6.59″ golden medium size display आहे. हा यूजर फ्रेंडली आणि वापरण्यास सुलभ आहे.. Redmi K90 हा फोन जांभळा आणि पांढरा रंगांच्या पर्यायांमध्ये येणार आहे. जांभळा आणि पांढरा दोन्ही रंग प्रकारांचे डिझाइन रेंडर देखील शेअर करण्यात आले आहेत आणि त्यांचे डिझाइन आस्पेक्ट्स देखील आता समोर आले आहेत.
Redmi K90 चा फ्लॅट डिस्प्ले अतिशय स्लिम, एकसमान बेझल आणि फ्रंट कॅमेऱ्यासाठी वरच्या बाजूला मध्यभागी असलेला होल पंच स्लॉटसह दिसत आहे. उजव्या बाजूला व्हॉल्यूम रॉकर आणि पॉवर बटण आहे.
Eason Chan रेडमी चा Acoustic Ambassador
रेडमी चा Acoustic Ambassador म्हणून Hong Kong बेस्ड गायक Eason Chan यांची निवड जाहीर करण्यात आली आहे.
Redmi K90 Pro Max ची 2.1 स्टीरिओ साउंड सिस्टम, तसेच Redmi K90 चे डिझाइन, परफॉर्मन्स, स्क्रीन आणि साउंड बाय बोस को-ट्यूनिंगची देखील त्याच्या टीझरमध्ये दाखवण्यात आली आहे. लाँचिंगबाबतच्या माहितीमध्ये Redmi K90 सीरीजमध्ये Redmi K90 आणि Redmi K90 Pro Max मॉडेल्स असल्याची माहिती आहे. 23 ऑक्टोबर 2025 दिवशी ही रेडमी स्मार्टफोन सीरीज चिनी बाजारात दाखल होणार आहे.
जाहिरात
जाहिरात
New Images of Interstellar Object 3I/ATLAS Show a Giant Jet Shooting Toward the Sun
NASA’s Europa Clipper May Cross a Comet’s Tail, Offering Rare Glimpse of Interstellar Material
Newly Found ‘Super-Earth’ GJ 251 c Could Be One of the Most Promising Worlds for Alien Life
New Fossil Evidence Shows Dinosaurs Flourished Until Their Final Days