Redmi K90 Series लवकरच होणार दाखल; चीन मध्ये प्री रिझर्व्हेशन सुरू

पेरिस्कोप टेलिफोटो लेन्स असलेला Redmi K90 Pro Max हा Redmi K सीरीज मधील पहिला स्मार्टफोन असू शकतो असे अंदाज बांधले जात आहेत.

Redmi K90 Series लवकरच होणार दाखल; चीन मध्ये प्री रिझर्व्हेशन सुरू

Photo Credit: Redmi

Redmi K90 Series फोनची किंमत सुमारे 49,000 रुपये पेक्षा जास्त, प्रीमियम श्रेणीत येईल

महत्वाचे मुद्दे
  • Xiaomi अध्यक्ष Lu Weibing ने Weiboवर Redmi K90 Series लॉन्चची घोषणा केली
  • Redmi K series आता स्टॅन्डर्ड, प्रो आणि प्रो मॅक्समध्ये येईल
  • Redmi K90 व्हॅनिला व्हेरिएंट Google Play Console वर दिसले
जाहिरात

Redmi K90 Series ची सध्या बाजारात लॉन्च पूर्वीच मोठी चर्चा सुरू आहे. Lu Weibing, Xiaomi President यांनी Weibo वर पोस्ट करत चीन मध्ये Redmi K90 Series लॉन्च होत असल्याची माहिती दिली आहे. हा लॉन्च सोहळा ओक्टोबर महिन्यातच होणार आहे. Lu Weibing यांनी लिहलेल्या पोस्ट मध्ये आगामी K series ही दोन महत्त्वाच्या अपग्रेड्स सह येणार असल्याची माहिती दिली आहे. फोनच्या स्पेसिफिकेशन्स आणि लाईन अप स्ट्रक्चर मध्ये बदल होणार आहेत. Redmi K series ही सामान्यपणे स्टॅन्डर्ड आणि प्रो व्हेरिएंट मध्ये येत होते पण आता आगामी लॉन्च मध्ये प्रो मॅक्स मॉडेल देखील K lineup मध्ये पहिल्यांदाच दिसणार आहे.

Lu Weibing यांनी पोस्ट मध्ये नमूद केल्यानुसार, Redmi K90 Pro Max हा “an all-around flagship,continuously breaking through,” असेल असं म्हटलं आहे. म्हणजेच हा फोन 'एक परिपूर्ण फ्लॅगशिप, सतत वेगाने पुढे येणारा' असा असेल. पूर्णपणे अपग्रेड केलेला एक प्रमुख वेल्डिंग गोलकीपर असा हा फोन असेल.

vanilla variant, Redmi K90 हे यापूर्वीच Google Play Console वर स्पॉट करण्यात आले आहेत. दरम्यान model number 2510DRK44C खाली हा लिस्ट करण्यात आला आहे. Geekbench database नुसार, या फोनमध्ये Snapdragon 8 Elite SoC, असण्याचा अंदाज आहे तर फोन Android 16, आणि 16GB of RAM वर चालणार आहे. 3C certificationअसल्याने हा फोन 100W fast wired charging support असलेला असणार आहे.

Pro variant वाटत असलेले मॉडेल आता Pro Max झाले आहेत. Geekbench वर मॉडेल 25102RKBEC दिसत असल्याची माहिती आहे. यामध्ये Snapdragon 8 Elite Gen 5 SoC, 16GB RAM आणि Android 16 सपोर्ट असलेला फोन आहे. यासोबत 3C certification असल्याने 100W fast wired charging support असलेला फोन आहे.

सध्या Redmi K90 Series प्री रिझर्व्हेशनसाठी Xiaomi च्या चीन मधील वेबसाईट वर खुला करण्यात आला आहे. रिपोर्ट्सनुसार आगामी Redmi K90 Series मधील हँडसेट 4000 चिनी युआन (सुमारे 49,000 रुपये) पेक्षा जास्त किंमतीच्या स्मार्टफोनच्या श्रेणीत दाखल होण्याची अपेक्षा आहे. हे Redmi K90 Pro Max च्या अपेक्षित किंमतीची झलक देखील देते.

Comments
Gadgets 360 Staff
 ...अधिक
        
    

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. WhatsApp वर Quiz फीचर येणार? Channels साठी नव्या फीचरची चाचणी सुरू
  2. Samsung ने Galaxy S26 Edge रद्द केला, S26 लाइनअपमध्ये फक्त तीन व्हेरिएंट्स येणार असल्याची चर्चा
  3. Oppo Watch S लॉन्च; हेल्थ-फोकस्ड फीचर्स, किंमत पहा काय?
  4. Oppo Find X9 Series भारतात लवकरच येणार; पहा अपडेट्स
  5. Oppo Find X9 Pro आणि X9 मध्ये प्रीमियम Hasselblad कॅमेरे, दमदार चिपसेटचा समावेश
  6. OnePlus Ace 6 ची उत्सुकता शिगेला; समोर आली खास झलक
  7. OnePlus 15, Ace 6 एकाच दिवशी करणार एंट्री, कंपनीने लाँच डेट केली जाहीर
  8. चीन मध्ये OnePlus 15 5G दाखल होतोय 27 ऑक्टोबरला पहा भारतात कधी येणार? पहा अपडेट्स
  9. Instagram वर दिवाळी-थीम इफेक्ट्स आले; Instagram Stories आणि Reels ला पहा कसं लावायचं हे फिल्टर
  10. Apple MacBook Pro मध्ये स्मार्टफोनसारखा पंच-होल कॅमेरा आणि OLED डिस्प्ले येणार? चर्चांना उधाण
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »