Photo Credit: Reliance
Reliance Jio कडून नवा प्रिपेड प्लॅन लॉन्च करण्यात आला आहे. यामध्ये ग्राहकांना अनलिमिटेड व्हॉईसकॉल आणि एसएमएस सर्व्हिस मिळणार आहे. सोबतच ग्राहकांना सुमारे 2150 रूपयांचे अधिकचे फायदे देखील मिळणार आहेत. यामध्ये शॉपिंग वेबसाईट्स वर डिस्काऊंट्स, फूड डिलेव्हरी अॅप्स वर डिस्काऊंट मिळणार आहेत. तसेच काही फ्लाईट बुकिंग्स देखील डिस्काऊंट मिळणार आहेत. या प्लॅनची किंमत कंपनीने सुमारे 400 रूपयांपेक्षा अधिक ठरवली आहे. ज्या ग्राहकांना हा प्लॅन विकत घ्यायचा आहे त्यांना 11 जानेवारी 2025 पूर्वी हा रिचार्ज प्लॅन घ्यावा लागणार आहे.
Reliance Jio New Year Welcome Plan 2025 हा भारतामध्ये 2025 रूपये पासून उपलब्ध होणार आहे. या प्लॅनचे फायदे 200 दिवसांपर्यंत मिळणार आहेत तर Reliance Jio prepaid customers साठी हा प्लॅन 11 डिसेंबर 2024 ते 11 जानेवारी 2025 दरम्यान विकत घेण्याची संधी मिळणार आहे.
2025 रूपयांच्या रिचार्ज मध्ये रिलायंस जिओ कस्टमर्सना JioTV, JioCinema, आणि JioCloud subscriptions मिळणार आहे. याच्या माध्यमातून त्यांना 2150 रूपयांची कूपन्स मिळतील. यामध्ये 500 रूपयांच्या Ajio coupon चा देखील समावेश असेल. मात्र ते रिडीम करण्यासाठी 2500 रूपयांची खरेदी ई कॉमर्स वेबसाईट वर करावी लागणार आहे.
Reliance Jio New Year Welcome Plan सोबतच्या अन्य बेनिफिट्स मध्ये स्विगीच्या 499 रूपयांच्या खरेदीवर 150 रूपयांची सूट मिळणार आहे. EaseMyTrip.com वरून बुकिंग केल्यास फ्लाईट बुकिंग वर 1500 रूपयांची सूट मिळणार आहे.
जाहिरात
जाहिरात