Photo Credit: Samsung
Samsung कडून San Jose मध्ये झालेल्या Samsung Developer Conference 2024 मध्ये त्यांच्या स्मार्टफोन आणि अन्य डिव्हाईस मध्ये One UI 7 update ची घोषणा करण्यात आली आहे. सॅमसंगने त्यांच्या आगामी अपडेट्स ची झलक दाखवली आहे. यामध्ये इंटरफेस पूर्णपणे नव्याने डिझाईन केला आहे. One UI 7 कधी येईल याची टाईमलाईन देण्यात आली आहे. सॅमसंग डिव्हाईस आणि रजिस्टर झालेली बीटा टेस्टर्स यांचाही त्यामध्ये समावेश असणार आहे.
Samsung च्या माहितीनुसार, One UI 7 update मध्ये 3 महत्त्वाची ध्येय असणार आहेत. Purposeful simplicity, signature impression, आणि emotional attachment यावर त्यांचं लक्ष असणार आहे. One UI 7 हे अशाप्रकारे डिझाईन करण्यात आले आहे ज्यात युजर्सला काय करायचं आहे ते समजू शकेल असं डिझाईन करण्यात आलं आहे. तर किचकटपणा कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचं डिझाईन असं केलं आहे की त्याचा लूक अधिक क्लिन असेल.
One UI 7 मध्ये Samsung's Android skin चे काही signature design elements तसेच ठेवले जाणार आहेत. नव्या blur system मुळे युजर्सना याचा वापर अधिक प्रभावीपणे जाणवेल. आता नव्या होम स्क्रिन मध्ये ते अधिक “slicker” असतील. त्यामुळे गॅलेक्सी डिव्हाईस मध्ये त्याचा वापर अधिक चांगला होणार आहे.
One UI 7 द्वारा Samsung smartphones मध्ये Android 15 असणार आहे. next-generation Android operating system ही जगभरामध्ये मागील महिन्यात लॉन्च केली आहे. पण ते मोजक्याच original equipment manufacturers मध्ये उपलब्ध असणार आहेत. Samsung कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, One UI 7 द्वारा उत्तम लॉक, कस्टमायझेशनला उत्तम वाव असणार आहे.
Samsung ने दिलेल्या माहितीनुसार, नवा One UI 7 अपडेट हा beta वर Galaxy devices वर वर्षअखेरीपर्यंत मिळणार आहे. तर software update चे official version हे पुढील वर्षापासून मिळणार आहे. Samsung Galaxy S series हे पहिलं डिव्हाईस असणार आहे ज्यामध्ये One UI 7 असेल. Galaxy S25 series,2025 च्या सुरूवातीला पदार्पण करणारे असू शकते.
जाहिरात
जाहिरात