लवकरच Samsung घेऊन येणार आहे, त्यांचा एन्ट्री लेवल स्मार्टफोन म्हणजेच Samsung Galaxy A06. सध्या चर्चेत असलेला हा स्मार्टफोन कंपनीकडून केव्हा लॉन्च होणार ह्याची उत्सुकता सर्वच वापरकर्त्यांना लागली आहे. तरीसुद्धा Samsung ने वापरकर्त्यांची उत्सुकता कदाचित अजून ताणून धरण्यासाठी का होईना, एक रेंडर लॉन्च केला आहे, जो विशेष करून ह्या स्मार्टफोन बद्दल बरीचशी माहिती आपल्यापर्यंत पोहचवत आहे. चला तर मग बघुयात काय आहे रेंडर मध्ये आणि काय आहेत Samsung Galaxy A06 ची वैशिष्ट्ये.
Samsung Galaxy A06 चे डिझाइन आणि रेंडर
टिपस्टर स्टीव हेमरस्टोफर ने GizNext सोबत भागीदारी करून Samsung Galaxy A06 ह्या स्मार्टफोनचे एक रेंडर प्रदर्शित केले आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये सेल्फी कॅमेऱ्यासाठी वॉटरड्रॉप-स्टाईल नॉचसोबत फ्लॅट डिस्प्ले देण्यात येईल, ज्याभोवती प्रमुख बेझल्स आणि सपाट कडा असतील. स्मार्टफोनच्या उजव्या बाजूला पॉवर की सोबत वोल्यूम की सुद्धा देण्यात आल्या आहेत. ज्यांच्या जवळच एक फिंगरप्रिंट स्कॅनर सुद्धा असणार आहे. स्मार्टफोनचा मागील भाग हा चकचकीत असून LED फ्लॅश लाइटसह दोन कॅमेऱ्यांचा सेट अप आपल्याला ह्यामध्ये पाहायला मिळतो.
Samsung Galaxy A06 च्या तळाशी ब्रॅण्डिंगच्या उद्देश्याने Samsung चा लोगो देण्यात आला आहे. त्यासोबतच 3.5mm हेडफोन जॅक, USB Type-C पोर्ट आणि स्पीकर देण्यात आले आहेत.Samsung Galaxy A06 ची वैशिष्ट्ये
Samsung Galaxy A06 च्या वैशिष्ट्यांबाबत कोणतीही माहिती किंव्हा स्पष्टता ही कंपनीकडून देण्यात आलेली नसून ह्याबद्दल सर्व आवश्यक माहिती ही लॉन्च झालेल्या रेंडर मधूनच मिळते. थोडासा बदल म्हणून ह्या स्मार्टफोनमध्ये LCD स्क्रीन देण्यात येऊ शकते, सोबतच ह्याचा डिस्प्ले हा 6.7 इंचाचा असू शकतो.
Media Tek Helio G85 ह्या चीपसेटद्वारे समर्थित असणारा Samsung Galaxy A06 हा स्मार्टफोन अँड्रॉइड 14 चे समर्थन करतो. टिपस्टरकडून ह्या स्मार्टफोनच्या स्टोरेज किंवा रॅम बद्दल स्पष्ट माहिती देण्यात आलेली नसून अंदाजे ह्या स्मार्टफोन ची रॅम ही 6GB पासून सुरू होईल. शिवाय जास्तीच्या रॅम मध्ये ह्या स्मार्टफोनचे वेगवेगळे मॉडेल्स देखील उपलब्ध असू शकतात.
ह्या स्मार्टफोमध्ये दोन मागील कॅमेऱ्यांचा सेटअप देण्यात येणार असून हे कॅमेरे किती मेगापिक्सल चे असू शकतील ह्याबाबत ह्या रेंडर मध्ये काहीच माहिती देण्यात आलेली नाही आहे. पण ह्या स्मार्टफोन मध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आलेली असून ती 15w च्या चार्जिंगचे समर्थन करते.
Samsung Galaxy A06 हा स्मार्टफोन भारतात केव्हा लॉन्च होणार ही तारीख अजूनही कंपनीकडून सांगण्यात आलेली नाही पण आमच्या अपडेटस् कडे लक्ष ठेवा, जेणेकरून ह्या स्मार्टफोनची किंमत आणि लॉन्च होण्याची तारीख आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवू शकू.