Photo Credit: Samsung
Samsung Galaxy A16 5G is expected to succeed the Galaxy A15 5G
Samsung च्या Galaxy A15 4G नंतर आता त्याच्यामधील पुढील व्हेरिएंट Galaxy A16 5G आणि 4G हे बाजारात येण्याचा अंदाज आहे. सध्या ऑनलाईन त्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान त्याची किंमत आणि फीचर्स याबद्दल काही माहिती लीक झाली आहे. Galaxy A16 च्या 4G variant मध्ये MediaTek Helio G99 चीपसेट असण्याचा अंदाज आहे. तर Galaxy A16 5G मध्ये Exynos 1330 SoC असेल असाही अंदाज आहे.
Samsung Galaxy A16 4G आणि 5G स्मार्टफोन 6.7-inch full-HD+ (2,340 x 1,080 pixels) Super AMOLED स्क्रीन सह असू शकतो. त्यामध्ये 90Hz refresh rate असण्याचा अंदाज आहे. अशी Saminsider ची माहिती आहे. या स्मार्टफोन मध्ये डिस्प्ले देखील मोठा असण्याचा अंदाज आहे. रिपोर्ट्सनुसार, 5G version मध्ये microSD card च्या मदतीने 1.5TB पर्यंत स्टोरेज वाढवले जाऊ शकते. तर 4G स्मार्टफोन हा 1TB पर्यंत सपोर्ट करू शकतो.
चीप सेट आणि स्टोरेज सपोर्ट व्यतिरिक्त विचार केल्यास Samsung Galaxy A16 प्रमाणेच अन्य फीचर्स असू शकतात. रॅम 4GB आणि ऑनबोर्ड स्टोरेज सपोर्ट हा 128 GB पर्यंत असू शकतो. इतर सॅमसंग स्मार्टफोन प्रमाणे हा फोन देखील Android-based user interface वर असेल.
कॅमेरा चा विचार करता Samsung Galaxy A16 phones चे 4G आणि 5G variants हे triple rear camera units सह असणार आहेत. यामध्ये प्रायमरी कॅमेरा 50-megapixel sensor चा असेल तर 5 मेगा पिक्सेल सेंसर हा उल्ट्रा वाईड लेन्सचा असणार आहे. 2 मेगा पिक्सेल macro shooter असेल. मोबाईल मध्ये फ्रंट कॅमेरा हा 13-megapixel sensors चा असू शकतो.
फोनच्या कनेक्टीव्हिटीचा विचार करता त्या मध्ये dual-band Wi-Fi, Bluetooth 5.3, GPS,USB Type-C ports असणार आहेत. 5G version मध्ये NFC सह IP54-rated build असेल ज्यामुळे हा फोन धूळ आणि पाणी यांच्यापासून सुरक्षित राहू शकेल. सुरक्षेच्या दृष्टीने Galaxy A16 5G मध्ये fingerprint sensor असू शकतो.
Samsung Galaxy A16 5G आणि 4G दोन्ही स्मार्टफोन 5,000mAh batteries सह असणार आहे. यांना 25W wired fast charging चा सपोर्ट असेल. हॅन्डसेट चा आकार 164.4 x 77.9 x 7.9mm असू शकतो तर वजन 200g असण्याचा अंदाज आहे.
जाहिरात
जाहिरात