Samsung Galaxy A56, Galaxy A36, Galaxy A26 ला मिळाले TUV Rheinland सर्टिफिकेट्स; जगभर लॉन्च होण्याचा अंदाज

Galaxy A56 आणि Galaxy A36 मॉडेल 45W ला सपोर्ट करू शकतात.

Samsung Galaxy A56, Galaxy A36, Galaxy A26 ला मिळाले  TUV Rheinland सर्टिफिकेट्स; जगभर लॉन्च होण्याचा अंदाज

Photo Credit: Samsung

सॅमसंग फोनचे डिझाईन त्यांच्या पूर्ववर्तींसारखेच असल्याचे नोंदवले जाते

महत्वाचे मुद्दे
  • Galaxy A56, Galaxy A36, आणि Galaxy A26 लवकरच लॉन्च होण्याचा अंदाज
  • Galaxy A56 आणि Galaxy A36 हे fast wired charging capability ला सपोर्ट करण
  • Galaxy A26 मध्ये 25W चार्जिंग सपोर्ट असू शकतो
जाहिरात

मागील आठवड्यामध्ये Galaxy Unpacked 2025 event ला Galaxy S25 series ची घोषणा झाल्यानंतर आता सॅमसंग कडून अजून तीन स्मार्टफोन लॉन्च होणार आहेत. Galaxy A56, Galaxy A36, आणि Galaxy A26,चा त्यामध्ये समावेश आहे. certification website, वर हे स्मार्टफोन दिसत आहेत. त्यामुळे आता जागभर हे स्मार्टफोन उपलब्ध असतील अशी माहिती देण्यात आली आहे. लिस्टिंग मध्ये charging capabilities ची माहिती मिळाली आहे. Galaxy A56 आणि Galaxy A36 हे fast wired charging capability ला सपोर्ट करतात.

Gizmochina report,नुसार तिन्ही फोन्स हे TUV Rheinland website वर आहेत. Galaxy A56 हा स्मार्टफोन चा मॉडेल नंबर SM-A566B/DS, SM-A566B, SM-A566E/DS,आणि SM-A566E चा अंदाज आहे. तर Galaxy A36 मध्ये SM-A366B, SM-A336B/DS, SM-A366E, SM-A366E/DS, SM-A366U, SM-A366U1, SM-A366W, SM-S366V, आणि SM-A3660 मॉडेल्स आहेत.

दोन्ही स्मार्टफोनबद्दल काही अफवा समोर आल्या आहेत त्यानुसार, TUV Rheinland वेबसाइटने असेही सुचवले आहे की numbered series मधील दुसरे मॉडेल लाँच केले जाऊ शकते. डिव्हाइस, Galaxy A26, SM-A266B/DS, SM-A266B, SM-A266M/DS आणि SM-A266M मॉडेल क्रमांकांसह सूचीबद्ध आहे.

लिस्टिंग वरील माहितीनुसार, Galaxy A56 आणि Galaxy A36 मध्ये 45W फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट असेल. दरम्यान, Galaxy A26 25W वर किंचित हळू चार्जिंगला सपोर्ट देईल. कथित Samsung Galaxy A56 देखील यूएस फेडरल कम्युनिकेशन्स कमिशन (FCC) वेबसाइटवर SM-A566E/DS या मॉडेल क्रमांकासह सूचीबद्ध केले गेले आहे. सूचीवरून असे दिसून आले आहे की ते कनेक्टिव्हिटीसाठी Bluetooth 5.3, Wi-Fi 6, NFC, आणि GNSS सपोर्ट आहे.

फोन 10V 4.5A अंदाजे 45W वर चार्जिंगला सपोर्ट करत असल्याची नोंद आहे, तो FCC डेटाबेसमध्ये Samsung EP-TA800 अडॅप्टरसह दिसतो, जो 25W वायर्ड चार्जिंगसाठी रेट केला जातो.

या स्मार्टफोनमध्ये Snapdragon 6 Gen 3 किंवा Snapdragon 7s Gen 2 चिपसेट असण्याचा अंदाज आहे. यात 50MP मुख्य कॅमेरा आणि अपडेटेड 12MP सेल्फी असल्याचा अंदाज आहे. बॅटरीची क्षमता देखील 5,000 mAh असल्याचा अंदाज आहे.

Comments
Gadgets 360 Staff
 ...अधिक
        
    
फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. BSNL चा नवा पोर्टल सुरु; सिम कार्ड आता थेट घरपोच मिळणार
  2. Honor X9c भारतात होणार लॉन्च; 108MP कॅमेरा, कर्व्ह डिस्प्ले आणि दमदार फीचर्ससह
  3. दमदार बॅटरी आणि प्रोसेसरसह Poco F7 5G भारतात सादर
  4. फक्त ₹10,000 मध्ये Vivo T4 Lite 5G, 6000mAh बॅटरीची हमी
  5. Samsung चा Galaxy Unpacked 2025 होणार 9 जुलैला; Foldables येणार ग्राहकांसमोर
  6. Vivo Unveils X200 FE मध्ये काय आहेत खास फीचर्स? भारतात लॉन्च कधी? घ्या जाणून अपडेट्स
  7. Nothing Phone 3 मध्ये पहा कॅमेरा बद्दलचे अपडेट्स; 50MP Triple Camera System असणार
  8. Oppo Reno 14 5G स्मार्टफोन लवकरच Amazon, Flipkart द्वारा भारतातही येणार; झलक आली समोर
  9. OnePlus चा नवा नेकबँड भारतात लाँच; एका चार्ज मध्ये तब्बल 36 तास चालणार, विक्री 24 जूनपासून
  10. Samsung Galaxy M36 5G ची भारतातील लॉन्च डेट जाहीर; डिझाइन लीक आधीच समोर
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »