Photo Credit: Samsung
सॅमसंग गॅलेक्सी एफ१६ ५जी ब्लिंग ब्लॅक, ग्लॅम ग्रीन आणि व्हायबिंग ब्लू रंगात उपलब्ध आहे.
Samsung Galaxy F16 5G भारतामध्ये लॉन्च करण्यात आला आहे. या नव्या Galaxy F16 5G फोनमध्ये MediaTek Dimensity 6300 chipset आहे. तर त्यामध्ये 5,000mAh battery आणि 25W wired fast charging support आहे. फोनमधील कॅमेर्याचा विचार करता तो 50-megapixel triple rear camera unit आणि 13-megapixel selfie shooter सह आहे. फोनमध्ये सहा OS upgrades मिळणार आहेत तर 6 वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स मिळणार आहेत.
Samsung Galaxy F16 5G भारतामध्ये Rs. 11,499 पासून सुरू होतो. 13 मार्च दिवशी दुपारी 12 वाजल्यापासून त्याची विक्री सुरू होणार आहे. फ्लिपकार्टच्या प्रोमोशनल बॅनर वर त्याची माहिती देण्यात आली आहे. हा फोन फ्लिपकार्ट वर खरेदी करता येणार आहे. Bling Black, Glam Green आणि Vibing Blue या रंगांमध्ये हा फोन उपलब्ध असणार आहे.
Galaxy F16 5G बाबतच्या पूर्वीच्या लिक्स नुसार, भारतत फोनची किंमत Rs. 13,499, Rs. 14,999, आणि Rs. 16,499आहे. हा फोन 4GB, 6GB आणि 8GB RAM चा पर्याय उपलब्ध आहे. सार्या व्हेरिएंटस मध्ये 128 जीबी स्टोरेज उपलब्ध आहे.
Samsung Galaxy F16 5G मध्ये 6.7-inch full-HD+ (1,080 x 2,340 pixels) Super AMOLED display आहे तर 90Hz refresh rate आहे. हॅन्डसेट मध्ये MediaTek Dimensity 6300 chipset आहे. ती 8 जीबी रॅम सोबत जोडलेली आहे. दरम्यान ऑनबोर्ड स्टोरेज हे 128 जीबी आहे. microSD card च्या मदतीने 1.5TB external storage वाढवता येते. हा फोन Android 15-based One UI 7 सोबत येणार आहे. तर फोनला सहा OS upgrades आणि सहा वर्षांचे security updates मिळणार आहेत.
फोनचा कॅमेरा पाहता त्यामध्ये 50 megapixel primary sensor आहे. 5-megapixel ultrawide shooter,आणि 2-megapixel macro sensor आहे. फोनमध्ये 13-megapixel sensor हा फ्रंटला आहे.
Galaxy F16 5G मध्ये 5,000mAh battery आहे. तर त्याच्यासोबत 25W wired fast charging support आहे. फोनच्या कनेक्टिव्हिटीसाठी 5G, 4G, Wi-Fi, Bluetooth 5.3, GPS, Glonass, Beidou, Galileo, QZSS आणि USB Type-C port आहे. हा फोन आकाराने 164.4 x 77.9 x 7.9mm आहे तर वजनाला 191 ग्राम आहे.
जाहिरात
जाहिरात