Photo Credit: Samsung
सॅमसंग गॅलेक्सी F36 5G हा गॅलेक्सी M36 5G सोबत गुगल प्ले कन्सोलवर दिसला (चित्रात)
Samsung कडून आगामी F-series phone F36 5G, भारतात लॉन्च साठी सज्ज झाला आहे. हा स्मार्टफोन भारतामध्ये 19 जुलै दिवशी उपलब्ध असणार आहे. F36 5G, मध्ये मागील बाजूला वीगन लेदर फिनिश आहे. 50MP cameras आहे तर फोनची जाडी 7.7mm आहे. Samsung Galaxy F36 5G ची किंमत देखील तपशीलांशिवाय उघड करण्यात आली आहे,परिणामी या फोनमुळे मिड रेंज स्मार्ट फोनच्या मार्केट मध्ये नव्या फोनची एंट्री असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हा फोन 20 हजार पेक्षा कमी रूपयांत उपलब्ध असण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. हा स्मार्टफोन अलीकडेच Google Play Console database वर देखील दिसला, ज्याने त्याची रचना आणि काही हार्डवेअर स्पेसिफिकेशन्स बद्दल माहिती दिली आहे.
सॅमसंगच्या माहितीनुसार, Galaxy F36 5G ची किंमत 20 हजार पेक्षा कमी असणार आहे. Galaxy F36 5G मध्ये optical image stabilisation (OIS) सह 50MP चा मुख्य कॅमेरा असेल आणि मागील बाजूस आणखी दोन सेन्सर असणार आहेत. टीझर इमेजमध्ये फोनच्या वरच्या डाव्या कोपऱ्यात vertical alignment मध्ये कॅमेरे दाखवले आहेत, ज्याच्या अगदी काठावर सिम ट्रे देखील असेल. Galaxy F36 5G हा 7.7mm जाडीचा असेल, ज्यामुळे तो त्याच्या किंमतीतील thinnest phones पैकी एक असणार आहे.
सॅमसंगने ठोस दिलेल्या माहितीमध्ये Galaxy F36 5G मध्ये 6GB रॅमसह Exynos 1380 प्रोसेसर आणि Android 15-आधारित One UI सॉफ्टवेअर असण्याची अपेक्षा आहे. पुढील F-सिरीज फोनशी जोडलेल्या मॉडेल नंबरसह सॅमसंग फोनच्या Google Play Console लिस्टिंगमधून ही माहिती समोर आली आहे. या लिस्टिंगमधील माहितीनुसार फोनमध्ये 6.7-inch full-HD+ 120Hz Infinity-U Super AMOLED display असेल आणि त्यात OIS, an 8MP ultrawide camera, a 2MP macro camera,आणि पुढील आणि मागील दोन्ही कॅमेऱ्यांवर 10-bit HDR video recording साठी सपोर्ट असेल.
Galaxy F36 5G मध्ये six generations of Android OS upgrades आणि सुरक्षा अपडेट्स असण्याची अपेक्षा आहे. डिस्प्लेमध्ये Corning Gorilla Glass Victus+ protection असेल. लिस्टिंगमध्ये असेही दिसून आले आहे की Galaxy F36 5G मध्ये 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट असलेली 5000mAh बॅटरी असेल.
जाहिरात
जाहिरात