Amazon India ने लिस्ट केलेल्या Samsung Galaxy M07 ची किंमत Rs. 6,999 दाखवण्यात आली आहे.
Photo Credit: Samsung
Samsung Galaxy M07 च्या लिस्टिंगवरून असे दिसून येते की तो काळ्या रंगात येईल
Samsung Galaxy M07 हा स्मार्टफोन Amazon India वर लिस्ट करण्यात आला आहे. लॉन्च पूर्वीच हा फोन लिस्ट झाला असल्याने या फोनची किंमत आणि अन्य स्पेसिफिकेशन्स यांची माहिती मिळाली आहे. Galaxy M07 या फोनमध्ये 6.7-inch display आहे. MediaTek Helio G99 प्रोसेसरचा त्यामध्ये समावेश आहे. हा फोन एंट्री लेव्हल फोन असणार आहे. त्यामध्ये ड्युअल रेअर कॅमेरा सेटअप असणार आहे. सोबतच फोनमध्ये 5,000mAh battery चा समावेश असून त्याला 6 Android updates आणि सहा वर्षांचे security updates मिळणार आ हेत.Samsung Galaxy M07 ची काय असेल किंमत ?Amazon India ने लिस्ट केलेल्या Samsung Galaxy M07 ची किंमत Rs. 6,999 आहे. हा फोन केवळ 4GB RAM + 64GB storage variant मध्ये उपलब्ध असणार आहे. हा फोन काळ्या रंगामध्ये उपलब्ध असणार आहे. अद्याप फोनच्या अन्य रंगांबद्दलचे अपडेट्स समोर आलेले नाहीत. Amazon Pay ICICI credit card वापरून फोन खरेदी करणार्यांना 5% पर्यंत कॅशबॅक मिळणार आहे. मात्र यासाठी फोन अमेझॉन वरून खरेदी करणं आवश्यक आहे. दरम्यान SBI Cards च्या माध्यमातून व्यवहार करणार्यांना 325 रूपयांपर्यंत डिस्काऊंट मिळणार आहे. ईएमआय पर्याय देखील देण्यात आला असून हे ईएमआय 339 रूपयांपासून सुरू होत आहेत. एक्सचेंज ऑफर्स साठी 6600 ची लिमिट आहे.
Samsung Galaxy M07 हा कंपनीच्या भारतीय वेबसाईट वर देखील दिसत आहे. मात्र अद्याप तेथे किंमत आणि उपलब्धता याबद्दल माहिती अपडेट केलेली नाही.
Samsung Galaxy M07 हा फोन Android 15 वर चालतो. जो One UI 7.0 बेस्ड आहे. या फोनमध्ये 6 Android OS updates मिळणार असल्याची पुष्टी करण्यात आली आहे. या फोनमध्ये 6.7-inch HD+ (720×1600 Pixels) display आहे. 90Hz refresh rate आणि 260ppi pixel density आहे. हा फोन octa core MediaTek Helio G99 chipset वर चालतो. त्यासोबत 4GB of RAM आणि 64GB of storage आहे. Samsung Galaxy M07 मधील कॅमेरा पाहता तो ड्युअल रिअर कॅमेरा युनिट सह आहे ज्यामध्ये f/1.8 अपर्चरसह 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर आणि 2-मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ चॅटसाठी, हँडसेटमध्ये f/2.0 अपर्चरसह 8-मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा आहे.
जाहिरात
जाहिरात