Samsung Galaxy M17 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असेल, ज्यामध्ये OIS सह 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर असेल
Photo Credit: Samsung
Samsung Galaxy M17 5G मध्ये 7.5mm पातळ प्रोफाइल असल्याचे सांगितले जात आहे
Samsung Galaxy M17 5G लवकरच भारतामध्ये लॉन्च होणार आहे. सॅमसंग कडून या आगामी फोनचा अधिकृत टीझर समोर आणला आहे. नव्या Galaxy M-series फोनचे रंग आणि डिझाईन चे अपडेट्स आता समोर आले आहेत. हा फोन ग्राहकांना अमेझॉन वर विक्रीसाठी खुला होणार आहे. दरम्यान सॅमसंगच्या या नव्या फोनमध्ये 6.7-inch AMOLED display आणि 50-megapixel triple rear camera असणार आहे. दरम्यान या फोनला IP54 रेटिंग असून तो फोन धूळ, पाण्यापासून सुरक्षित असणार आहे. Galaxy M16 5G चा उत्तराधिकारी म्हणून या फोनकडे पाहिले जात आहे.Samsung Galaxy M17 5G ची अपेक्षित स्पेसिफिकेशन्स,सॅमसंगने दिलेल्या माहितीनुसार, Samsung Galaxy M17 5G ची लाँचिंग 11 ऑक्टोबर रोजी होईल. अमेझॉनवर Moonlight Silver आणि Sapphire Black रंगाच्या पर्यायांमध्ये तो विक्रीसाठी उपलब्ध होईल अशी माहिती देण्यात आली आहे. अमेझॉन आणि सॅमसंगने Galaxy M17 5G ची लाँचिंग तारीख आणि स्पेसिफिकेशन जाहीर करण्यासाठी खास वेबपेज प्रकाशित केले आहे. या हँडसेटमध्ये Corning Gorilla Glass Victus protection सह 6.7 इंचाचा Super AMOLED display असण्याची माहिती देण्यात आली आहे. धूळ आणि स्प्लॅश प्रतिरोधकतेसाठी त्याला IP54 रेटिंग देखील आहे.
Samsung Galaxy M17 5G मध्ये Exynos 1330 प्रोसेसर आणि 4GB रॅम असण्याची अपेक्षा आहे. हा फोन One UI 7 इंटरफेससह Android 15 वर चालण्याची शक्यता आहे.
Samsung Galaxy M17 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असेल, ज्यामध्ये OIS सह 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर असेल. कॅमेरा युनिटमध्ये 5-मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड अँगल कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेलचा मॅक्रो सेन्सर देखील असेल. सेल्फी आणि व्हिडिओ चॅटसाठी, 13-मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा असेल. हँडसेटमध्ये AI पॉवर्ड फोटोग्राफी फीचर्स असतील. Galaxy M17 5G मध्ये 7.5 मिमी पातळ प्रोफाइल असल्याचे सांगितले जात आहे. यात गुगलसह सर्कल टू सर्च आणि जेमिनी लाईव्ह सारखे एआय फीचर्स असतील.
आगामी Galaxy M17 5G मध्ये Galaxy M16 5G पेक्षा जास्त अपग्रेड असण्याची शक्यता आहे. Galaxy M16 5G या वर्षी मार्चमध्ये 4GB + 128GB स्टोरेज मॉडेलसाठी 11,499 रुपयांच्या किंमतीसह लाँच करण्यात आला होता. सॅमसंगने अद्याप किंमत जाहीर केलेली नसली तरी, Galaxy M17 5G हा स्मार्टफोन 15,000 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या सेगमेंटमध्ये येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
जाहिरात
जाहिरात