Photo Credit: Samsung
Samsung ने नुकताच त्यांचा Samsung Galaxy Quantum 5 हा स्मार्टफोन लाँच केला, जो त्यांच्या Galaxy A55 स्मार्टफोनची सुरक्षित आवृत्ती म्हणायला हरकत नाही. विशेष म्हणजे हा स्मार्टफोन SK Telecom आणि ID Quantique यांच्या सहकार्याने हा स्मार्टफोन दक्षिण कोरियाच्या बाजारपेठेसाठी डिझाइन करण्यात आला आहे. त्यासोबतच या स्मार्टफोन Quantum Criptography Security चीपसोबत त्याची ऑनलाईन सुरक्षा क्षमता वाढवण्याचे महत्वाचे कार्य करते. चला तर मग बघुया काय आहेत, Samsung Galaxy Quantum 5 ची वैशिष्ट्ये, किंमत आणि उपलब्धता.
Samsung Galaxy Quantum 5 हा स्मार्टफोन सध्यातरी कोरियन बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध असून त्याची किंमत 618200 कोरियन वोन रुपये इतकी असून भारतामध्ये ही किंमत 38,750 रुपये इतकी ठरते. लॉन्च झाल्यानंतर हा स्मार्टफोन ब्लू, लीलाक आणि नेवी अशा तीन रंगांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो.
Samsung Galaxy Quantum 5 या स्मार्टफोनची मध्ये FHD+ रिजोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटसोबत 6.6 इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले बसविण्यात आला आहे. हा स्मार्टफोन Exynos 1480 या चिपसेटद्वारे समर्थित असून Android 14 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. डिव्हाइस ID Quantique कडून क्वांटम रँडम नंबर जनरेटर (QRNG) चिपने सुसज्ज आहे.
या स्मार्टफोनच्या कॅमेरा सेटअपमध्ये 50 मेगापिक्सलचा प्राथमिक मागील कॅमेरा सोबत 12 मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड कॅमेरा, 5 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आणि 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. Samsung Galaxy Quantum 5 ची रॅम 8 GB असून स्टोरेज क्षमता 128 GB असून मायक्रो एसडीसोबत 1 TB पर्यंत वाढविण्यात येऊ शकते. Samsung Galaxy Quantum 5 या स्मार्टफोनच्या स्क्रीनला गोरिल्ला ग्लास व्हिक्टस संरक्षण आहे, तर फोनला मेटल फ्लॅट फ्रेम देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, या स्मार्टफोनमध्ये 5,000mAh बॅटरी आहे, जी 25W च्या जलद चार्जिंगला सपोर्ट करते. जी एकदा चार्ज केल्यानंतर सलग 28 तासांपर्यंत चालू शकते.
ID Quantique ची क्वांटम रँडम नंबर जनरेटर ही चिप यादृच्छिक संख्या व्युत्पन्न करण्यासाठी क्वांटम भौतिकशास्त्र वापरते. पारंपारिक यादृच्छिक संख्या जनरेटरच्या विपरीत, ज्यावर बाहेरील घटकांचा प्रभाव असू शकतो, QRNGs अशा यादृच्छिक आणि अप्रत्याशित संख्या तयार करतात. हे नंबर नंतर बायोमेट्रिक्स किंवा पासवर्ड सारख्या संवेदनशील डेटाच्या एन्क्रिप्शन किंवा डिक्रिप्शन प्रक्रियेत वापरले जातात.
जाहिरात
जाहिरात