Samsung Galaxy S24 Ultra चे बेस मॉडेल (12GB RAM आणि 256GB स्टोरेजसह) Amazon वर सध्या 1,34,999 रूपयांना लिस्टेड आहे तो Rs. 71,999 मध्ये खरेदी करता येईल
सॅमसंग गॅलेक्सी एस२४ अल्ट्रा (चित्रात) जानेवारी २०२४ मध्ये लाँच झाला
Samsung Galaxy S24 Ultra जानेवारी 2024 मध्ये लाँच झाला होता आणि आजही तो सर्वोत्तम स्मार्टफोन्सपैकी एक मानला जातो. लाँचला दीड वर्ष उलटलं असलं तरी या फोनची किंमत अजूनही प्रीमियम श्रेणीतच आहे. मात्र, वर्षभरातील विविध सेल इव्हेंट्समध्ये या मॉडेलची किंमत लक्षणीयरीत्या कमी होत असते. यापैकीच एक मोठा सेल म्हणजे Amazon Great Indian Festival Sale 2025.अमेझॉनचा हा सेल 23 सप्टेंबर पासून सुरू होत आहे. या सेलमध्ये Samsung Galaxy S24 Ultra 72,000 रूपयांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. हा आतापर्यंतचा या हँडसेटचा सर्वात कमी दर असू शकतो.
Samsung Galaxy S24 Ultra चे बेस मॉडेल (12GB RAM आणि 256GB स्टोरेजसह) Amazon वर सध्या 1,34,999 रूपयांना लिस्टेड आहे. मात्र, येत्या Amazon Great Indian Festival Sale 2025 मध्ये या फ्लॅगशिप स्मार्टफोनवर थेट किंमत कपात केली जाणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. सेल सुरू झाल्यानंतर Samsung Galaxy S24 Ultra 71,999 रूपयांमध्ये खरेदी करता येईल. ही किंमत फक्त थेट प्राइस कटसाठी लागू असून इतर ऑफर्स यात समाविष्ट नाहीत.
ग्राहकांना SBI डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड EMI व्यवहारांवर १०% इन्स्टंट डिस्काउंट मिळणार आहे. याशिवाय, नो-कॉस्ट EMI, एक्स्चेंज ऑफर्स आणि Amazon Pay ऑफर्स सुद्धा उपलब्ध राहतील. हे गॅलेक्सी S24 अल्ट्रावर मिळणाऱ्या सर्वात कमी किमतींपैकी एक आहे.
जुलै महिन्यातील Amazon Prime Day Sale दरम्यान ही किंमत 74,999 रूपये इतकी होती. तर, Flipkart वर हाच व्हेरिएंट (12GB + 256GB) 54,990 रूपयांमध्ये लिस्ट केला आहे, मात्र ही किंमत फक्त Big Billion Days Sale दरम्यानच उपलब्ध होणार असून त्यात कार्ड ऑफर्स आणि सवलतींचा समावेश असेल.
2025 मध्ये Samsung Galaxy S24 Ultra खरेदी करणे फायद्याचा आहे का? असा प्रश्न पडला असेल तर जाणून घ्या - हा हँडसेट फ्लॅगशिप-ग्रेड फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्ससह येतो. त्यामुळे नव्या फोनला टक्कर देणारा हा फोन आहे. सॅमसंग गॅलेक्सी एस२४ अल्ट्रा हा डिस्प्ले, परफॉर्मन्स, कॅमेरा आणि युजर इंटरफेसचे परिपूर्ण मिश्रण आहे. हे डिव्हाइस ६.८-इंच १२० हर्ट्झ एमोलेड पॅनेल सह येते.
जाहिरात
जाहिरात