Samsung Galaxy S25 बद्दल समोर आली नवी अपडेट; घ्या जाणून

इव्हेंट मध्ये 256GB आणि 512GB व्हेरिएंट ची माहिती देण्यात आली होती मात्र आता हा स्मार्टफोन 128GB मध्येही उपलब्ध होणार आहे.

Samsung Galaxy S25 बद्दल समोर आली नवी अपडेट; घ्या जाणून

Photo Credit: Samsung

Samsung Galaxy S25 ची सुरुवात रु. बेस 256GB मॉडेलसाठी भारतात 80,999

महत्वाचे मुद्दे
  • Samsung Galaxy S25 128GB साठी 74,999 रूपये मोजावे लागतील
  • Samsung India website वर अद्याप फोन लिस्ट झालेला नाही
  • केवळ ऑफलाईन रिटेल स्टोअर मधून फोन उपलब्ध होण्याचा अंदाज आहे
जाहिरात

Samsung Galaxy S25 series भारतामध्ये लॉन्च झाला आहे. Galaxy Unpacked 2025 event मध्ये 22 जानेवारीला तो लॉन्च झाला आहे. या इव्हेंट मध्ये 256GB आणि 512GB व्हेरिएंट ची उपलब्धता आणि किंमत जाहीर करण्यात आली होती. पण आता नवे रिपोर्ट्स पाहता या फोनच्या 128GB storage variant ची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे. याची किंमत तुलनेत कमी असणार आहे. त्यामुळे ग्राहकांना चांगल्या दरात एक किफायतशीर फोन विकत घेता येणार आहे.

91Mobiles Hindi च्या रिपोर्ट्सनुसार, Samsung Galaxy S25 128GB ची भारतामधील किंमत Rs. 74,999 असू शकते. अजून फोनच्या प्री बुकिंगला सुरूवात झालेली नसली तरीही या कॉन्फ्युगरेशनसाठी अजून काही वेळाची प्रतिक्षा करावी लागणार आहे. सॅमसंगच्या या नव्या फोनच्या उपलब्धतेवरही प्रश्नचिन्ह आहे. 128GB model अद्याप Samsung India website च्या अधिकृत वेबसाईट वर लॉन्च झालेली नाही. त्यामुळे हा फोन ऑफलाईन स्वरूपात विकला जाण्याचा अंदाज आहे. हा फोन सारख्याच कॉन्फ्युगरेशन मध्ये अमेरिकेत 799 डॉलर्स अर्थात 69,100 रूपयामध्ये उपलब्ध असण्याचा अंदाज आहे.

Galaxy S25 भारतामध्ये सुरूवातीला 256 जीबी आणि 512 जीबी स्टोरेज मध्ये उपलब्ध होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे त्याची किंमत 80,999 आणि 92,999 रूपये अशी सांगण्यात आली आहे. हा फोन Icy Blue, Mint, Navy, आणि Silver Shadow रंगांमध्ये उपलब्ध आहे. तर Blueblack, Coralred, आणि Pinkgold रंगामधील स्मार्टफोन केवळ सॅमसंगच्या ऑनलाईन स्टोअर वर उपलब्ध असणार आहे.

Samsung Galaxy S25 मध्ये स्पेसिफिकेशन्स काय?

Samsung Galaxy S25 मध्ये 6.2-inch Full-HD+ (1,080×2,340 pixels) Dynamic AMOLED 2X स्क्रीन आहे. हा फोन ड्युअल सीम स्मार्टफोन आहे. Android 15-based One UI 7वर तो चलातो. हा फोन octa core Snapdragon 8 Elite वर चालणार आहे. त्याची रॅम 12GB of LPDDR5x आणि 512GB of storage आहे.

फोनच्या कॅमेर्‍याचा विचार करता Galaxy S25 मध्ये ट्रिपल रेअर कॅमेरा आहे. 50-megapixel primary camera हा 2x in-sensor zoom आणि optical image stabilisation आहे. 12-megapixel ultra-wide angle lens मध्ये 120-degree field of view, आहे. 10-megapixel telephoto camera आहे. फोन मध्ये 12-megapixel front camera सेल्फी आणि व्हिडीओ कॉल साठी आहे.

Galaxy S25 मध्ये 4,000mAh battery असणार आहे त्यामध्ये 25W चार्जरचा सपोर्ट असणार आहे. हा वायर्ड चार्जर स्वतंत्र विकत घ्यावा लागणार आहे.

Gadgets 360 Staff रेसिडेंट बॉट. जर तुम्ही मला ईमेल केलात तर एक माणूस प्रतिसाद देईल. अधिक

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. OnePlus Nord Buds 4 Pro भारतात १९ मार्चला लॉन्च होणार
  2. Samsung Galaxy M17 5G भारतात लॉन्च; ५०MP कॅमेरा आणि ५,०००mAh बॅटरीसह दमदार फीचर्स
  3. WhatsApp अपडेट: इमोजी टाइप करताच मिळणार संबंधित स्टिकर्स, iPhone युजर्ससाठी नवीन फीचर
  4. वनप्लस 15T चे डिझाइन आणि रंग पर्याय अधिकृतपणे जाहीर; चीन लॉन्चपूर्वी फीचर्स समोर
  5. iQOO Z11 Turbo चा टीझर समोर; लवकरच लॉन्च, जबरदस्त बॅटरी आणि फास्ट चार्जिंगची शक्यता
  6. SIM Binding नियम काय आहे? मेसेजिंग अॅप्स आणि वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार
  7. Poco C85x 5G लवकरच भारतात; Flipkart मायक्रोसाइटवर डिझाइनची झलक
  8. Google Pixel 10a भारतात विक्रीसाठी उपलब्ध; 48MP कॅमेरा, 5100mAh बॅटरीसह किंमत ₹49,999
  9. Motorola Edge 70 Fusion किंमत आणि उपलब्धता
  10. Nothing Phone 4a सीरिज भारतात लॉन्च; किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाहीर
© Copyright Red Pixels Ventures Limited 2026. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »