Samsung Galaxy S25 Edge भारतात लॉन्च; किंमत लाखाच्या पुढे

Samsung Galaxy S25 Edge भारतात लॉन्च; किंमत लाखाच्या पुढे

Photo Credit: Samsung

सॅमसंग गॅलेक्सी एस२५ एजची जाडी ५.८ मिमी आहे

महत्वाचे मुद्दे
  • Samsung Galaxy S25 Edge ची भारतामधील किंमत Rs. 1,09,999 च्या पुढे
  • हा फोन Titanium Silver आणि Titanium Jetblack रंगांमध्ये उपलब्ध असणार
  • Samsung Galaxy S25 Edge मध्ये 200-megapixel primary sensor
जाहिरात

Samsung Galaxy S25 Edge ची झलक आज जगभर समोर आली आहे. या नव्या फोनची भारतामधील किंमत काय असेल? याचा खुलासा आज कंपनी कडून करण्यात आला आहे. Galaxy S25 Edge मध्ये Snapdragon 8 Elite आहे. ही गॅलेक्सी चीपसेट आहे. सोबत 200-megapixel dual rear camera unit आहे. सोबत फोनला Corning Gorilla Glass Ceramic 2 display protection आहे. फोनचा आकार 5.8mm आहे. हा Galaxy S seriesमधील सगळ्यात पातळ फोन आहे. फोनमध्ये 12GB RAM आहे. हा फोन 256GB आणि 512GB स्टोरेज व्हेरिएंट सोबत जोडलेला आहे. Galaxy S25 Edge हा सध्या भारतामध्ये प्री ऑर्डर्स साठी खुला करण्यात आला आहे.

भारतामधील Samsung Galaxy S25 Edge ची किंमत

Samsung Galaxy S25 Edge ची भारतामधील किंमत 12GB + 256GB या पर्यायासाठी Rs. 1,09,999 आहे. तर 12GB + 512GB व्हेरिएंटची किंमत Rs. 1,21,999 आहे. सध्या हा फोन भारतामध्ये प्री ऑर्डर साठी खुला आहे. Samsung India e-store वर त्याची ऑर्डर देता येऊ शकते. हा फोन Titanium Silver आणि Titanium Jetblack रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे.

फोनच्या प्री ऑर्डर मध्ये ग्राहकांना काही ऑफर्स देखील मिळणार आहेत. यामध्ये 512GB व्हेरिएंट फोन हा 256GB च्या पर्यायाच्या किंमतीमध्येच उपलब्ध होणार आहे.

Samsung Galaxy S25 Edge ची स्पेसिफिकेशन काय?

Samsung Galaxy S25 Edge मध्ये 6.7-inch quad-HD+ (1,440x3,120 pixels) AMOLED display आहे. Corning Gorilla Glass Ceramic 2 protection आहे. हा फोन Snapdragon 8 Elite वर चालतो तर फोन 12GB of RAM आणि 512GB of onboard storage मध्ये आहे. Android 15-based One UI 7 सोबत तो पाठवला जाणार आहे.

Samsung Galaxy S25 Edge मध्ये 200-megapixel primary sensor आहे. 2x optical in-sensor zoom आणि optical image stabilisation सपोर्ट आहे. फोनमध्ये 12-megapixel ultrawide shooter आहे. फोनच्या पुढच्या बाजूला 12-megapixel sensor आहे ज्याच्या मदतीने सेल्फी आणि व्हिडिओ कॉल केला जातो.

Samsung Galaxy S25 Edge मध्ये 3,900mAh battery असून तो 25W wired आणि Qi wireless चार्जिंग सपोर्ट सह आहे. कनेक्टिव्हिटी साठी 5G, 4G LTE, Wi-Fi 7, Bluetooth 5.4, NFC, GPS, तसेच USB Type-C port सह आहे. फोनचा आकार 158.2x75.6x5.8mm आहे तर वजन 163g आहे.

Comments
Gadgets 360 Staff The resident bot. If you email me, a human will respond. अधिक
फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी

जाहिरात

जाहिरात

© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »