Photo Credit: Samsung
सॅमसंग गॅलेक्सी एस२५ अल्ट्रामध्ये ५,००० एमएएच बॅटरी आहे
जेव्हा तुम्ही सॅमसंगच्या सध्याच्या प्रीमियम फोन्सच्या लाईन अप बद्दल विचार करता तेव्हा Galaxy S25 समोर येते आणि त्यामध्येही स्वाभाविकच सर्वांचे लक्ष Galaxy S25 Ultra वर जाते. Samsung Galaxy S25 Ultra ची झलक भारतात Galaxy Unpacked event मध्ये जानेवारी महिन्यात पहायला मिळाली. यावेळी फोनची किंमत Rs. 1,29,999 सांगण्यात आली होती. आता हा लेटेस्ट सॅमसंग फ्लॅग शीप स्मार्टफोन सवलतीच्या दरात विक्रीसाठी खुला आहे. सध्या या फोनवर 12 हजार पर्यंत instant cashback दिले जात आहे. हा फोन no-cost EMI सह अधिकच्या exchange offers सह उपलब्ध आहे. Galaxy S25 Ultra हा कस्टम Snapdragon 8 Elite वर चालतो या फोनमध्ये Galaxy chip 12GB of RAM आणि 1TB of storage सह जोडलेली आहे. जर तुम्हाला सॅमसंगचे सर्वोत्तम हवे असेल तर ते Ultra असले पाहिजे. हे ब्रँडचे टॉप-टियर ऑफरिंग आहे आणि ते प्रत्येक गोष्टीत दिसते . फोनच्या कामगिरी आणि कॅमेरापासून ते स्क्रीन आणि सॉफ्टवेअरपर्यंत सारेच अव्वल आहे पण असं असलं तरी, Samsung Galaxy S25 Ultra स्वस्त मिळत नाही.पण आता या फोन वर डिस्काऊंट जाहीर करण्यात आले आहे.
Samsung सध्या ऑनलाईन स्टोअर मध्ये Galaxy S25 Ultra च्या विक्री वर खास ऑफर देत आहे. ग्राहकांना इंस्टंट बॅंक डिस्काऊंट्स मिळणार आहेत. ही सुमारे 11 हजारची आहेत. Titanium Silverblue colour variant घेतल्यास 12 हजाराचा exchange bonus मिळेल. त्यामुळे फोनची किंमत Rs. 1,17,999 पर्यंत खाली आली आहे. ही ऑफर 30 एप्रिल पर्यंत वैध असणार आहे.
Shop App purchases वर ग्राहकांना 4000 रूपयांचा welcome benefit मिळणार आहे. Galaxy S25 Ultra चा No-cost EMI पर्याय अवघ्या 3278 रूपयांपासून सुरू होत आहे. ग्राहकांना 75 हजारांची सूट मिळणार आहे. जर त्यांनी जुना फोन एक्सचेंज केला.
Galaxy S25 Ultra हा स्मार्टफोन Android 15 वर चालतो. यामध्ये 6.9-inch (1,400x3,120 pixels) Dynamic AMOLED 2X screen आहे. 120Hz refresh rate and Corning Gorilla Armor 2 protection आहे. फोनमधील कॅमेरा पाहता तो quad rear camera unit सह आहे. त्यामध्ये 200-megapixel main camera,50-megapixel ultrawide camera, 50-megapixel telephoto camera,आणि 10-megapixel telephoto camera आहे. फोनच्या फ्रंट बाजूला 12-megapixel selfie camera आहे.
फोनमध्ये 5,000mAh battery आहे तर 45W wired charging आणि 15W wireless charging support आहे.
जाहिरात
जाहिरात