Photo Credit: Samsung
सॅमसंग गॅलेक्सी एस२५ अल्ट्रामध्ये क्वाड रियर कॅमेरा युनिट आहे
Samsung ने त्यांच्या फ्लॅगशीप Galaxy S25 Ultra ची किंमत भारतामध्ये कमी केली आहे. 2025 च्या जानेवारी महिन्यात बाजारात आलेल्या या स्मार्टफोनची किंमत Rs 1,29,999 होती. आता हा फोन Rs 1,17,999मध्ये खरेदी करता येणार आहे.सध्या Samsung Galaxy S25 Ultra या स्मार्टफोन वर 12 हजार रूपयांचा instant cashback जाहीर करण्यात आला आहे. सध्या या फोनच्या खरेदी मध्ये काही ऑफर्स देखील जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे तुम्ही फोन अपग्रेड करण्याचा विचार करत असाल तर जाणून घ्या या फोनच्या नव्या किंमती, ऑफर्स काय आहेत?Samsung Galaxy S25 Ultra वरील ऑफर्स,Samsung Galaxy S25 Ultra खरेदी करताना ग्राहकांना नो कॉस्ट इएमआय चा पर्याय आहे. यामध्ये ग्राहकांना प्रति महिना Rs 3,278 चा ईएमआय असेल. तर फोनवर एक्सचेंज बोनस Rs 75,000 पर्यंत असणार आहे. जुना फोन देऊन तुम्हांला Rs 75,000 पर्यंत सूट मिळवता येईल पण प्रत्येक फोनची एक्सचेंज व्हॅल्यू वेगळी असेल.
सॅमसंगने दिलेल्या माहितीनुसार, ही नवीन ऑफर फक्त सॅमसंगच्या ऑनलाइन स्टोअरवरून उपलब्ध असेल आणि 14 जून 2025 पर्यंत वैध राहणार आहे.
Galaxy S25 Ultra मध्ये 6.9-inch Dynamic AMOLED 2X screen आहे. डिस्प्लेला Corning Gorilla Armor 2 protection आहे. 200-megapixel main camera आहे तर 12-megapixel selfie camera आहे. Samsung Galaxy S25 Ultra मध्ये 5,000mAh battery आहे. Snapdragon 8 Elite वर चालणार्या या फोनमध्ये 12GB of RAM आणि 1TB of built-in storage आहे.
जाहिरात
जाहिरात