Photo Credit: Samsung
Samsung Galaxy S25 series जानेवारी महिन्यामध्ये लॉन्च होण्याचा अंदाज आहे. यावेळी या सीरीज मध्ये 3 ऐवजी 4 मॉडेल्स आहेत. त्यामध्ये बेस Galaxy S25, Galaxy S25+ आणि Galaxy S25 Ultra यांचा समावेश आहे तर स्लिम व्हेरिएंट नवा Galaxy S25 हा नंतर बाजरात येणार आहे. या मॉडेल्स मध्ये टॉप ऑफ द लाईन Galaxy S25 Ultra model मध्ये डिझाईनच्या दृष्टीने काही बदल करण्यात आले आहेत. त्यामध्ये मोबाईलचा आकार हा बाजूने दरवेळेप्रमाणे असणार्या चौकोनी ऐवजी थोडा वर्तुळाकार आहे. या बदलासह सध्या डमी फोनची झलक समोर आली आहे.
Galaxy S25 Ultra हा अधिक वर्तुळाकार डिझाईन मध्ये असणार आहे. लीक झालेल्या माहितीनुसार, Galaxy S24 Ultra च्या तुलनेमध्ये नव्या फोनच्या डिझाईन मध्ये थोडे बदल आहेत.
tipster @Jukanlosreve ने X वर या Samsung Galaxy S25 Ultra च्या डमी युनिट्सचे काही फोटोज शेअर केले आहेत. लीक्स नुसार, हा नॉन फोल्डेबल स्मार्टफोन असून त्यामध्ये काही डिझाईन बदल केले आहेत. सपाट ऐवजी राऊंडेड कडा आहेत. चार पैकी दोन रंग हे काळ्या शेड मध्ये असणार आहेत असे डमी युनिट्स मधून समोर आले आहे.
मागील काही वर्षात सॅमसंगचे अल्ट्रा मॉडेल्स हे बॉक्सी डिझाईन मध्ये असणार असं समीकरण होते पण आता Galaxy S25 Ultra पासून हा डिझाईन मध्ये बदल झाला आहे. फोनच्या उजव्या बाजूकडील पॉवर आणि व्हॉल्यूम बटणं आणि मागील कॅमेरा लेआउटसह सध्याच्या मॉडेल्समधून सारखेच डिझाईन एलिमेंट्स असू शकतात.
Samsung Galaxy S25 Ultra मध्ये 6.86-inch AMOLED screen with thinner bezels असण्याचा अंदाज आहे. यामध्ये 200-megapixel primary camera आहे तर 10-megapixel 3x telephoto camera,
50-megapixel 5x telephoto camera आणि अपग्रेडेड 50-megapixel ultrawide camera असण्याचा अंदाज आहे.
Samsung Galaxy S25 Ultra मध्ये Qualcomm च्या Snapdragon 8 Elite chipset चा सपोर्ट असणार आहे. ते 16GB of RAM सह जोडलेला आहे. या फोन मध्ये 5,000mAh बॅटरी असणार आहे तर 45W charging सपोर्ट असणार आहे. अलीकडील अहवालानुसार, हँडसेटचे साहित्याचे bill of materials (BoM) किमान $110 (अंदाजे रु. 9,300) त्याच्या आधीच्या फोन पेक्षा जास्त आहे, निवडक बाजारांमध्ये किमतीत वाढ होण्याच्या अंदाज आहे.
जाहिरात
जाहिरात