Galaxy S26 Pro वरील डिस्प्ले सुमारे 6.3 इंच असेल आणि डिव्हाइस अंदाजे 149.3 x 71.4 x 6.96 मिमी (मागील कॅमेरा बंपसह 10.23 मिमी) आकाराचा असू शकतो
अफवा असलेल्या Samsung Galaxy S26 Pro CAD रेंडर
Samsung Galaxy S26 Pro ची झलक ऑनलाईन माध्यमांतून समोर आली आहे. या फोनच्या नव्या रेंडर्स मध्ये कॅमेरा मॉड्युलची झलकही समोर आली आहे. नुकत्याच समोर आलेल्या Galaxy Z Fold 7 प्रमाणेच या फोनमध्येही कॅमेरा मॉड्युल्स असणार आहेत. मग आता या फोनच्या तपशीलांबद्दल तुमच्या मनातही कुतुहल वाढले असल्यास जाणून घ्या काय खास असेल सॅमसंगच्या या नव्या स्मार्टफोनमध्ये!
Galaxy S26 Pro रेंडर्स ‘Android Headlines'ने लीक केले होते जिथे त्यांनी असेही नमूद केले आहे की बेस मॉडेलचे नाव Pro moniker ने बदलले आहे. सॅमसंग लाइनअपमध्ये सुधारणा करत असल्याचे दिसते कारण प्लस मॉडेलची जागा Galaxy S26 Edge घेणार आहे, ज्याचे रेंडर देखील अलीकडेच लीक झाले होते.
Galaxy S26 Pro च्या रेंडरमध्ये, pill-shaped module मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप सह दिसत आहे. जो जवळजवळ Fold 7 आणि S25 Edge सारखाच दिसतो. शिवाय, बाजू सपाट राहतात आणि समोरील बेझल आकार देखील Galaxy S25 सारखाच दिसतो. बटणं उजवीकडे आहेत तर स्पीकर ग्रिल, सिम ट्रे आणि USB-C पोर्ट फोनच्या खालच्या बाजूला असेल. अहवालानुसार, Galaxy S26 Pro हा Galaxy S25 प्रमाणेच अॅल्युमिनियम आणि काचेपासून बनवला जाईल.
Galaxy S26 Pro वरील डिस्प्ले सुमारे 6.3 इंच असेल आणि डिव्हाइस अंदाजे 149.3 x 71.4 x 6.96 मिमी (मागील कॅमेरा बंपसह 10.23 मिमी) आकाराचा असू शकतो. यावरून असे सूचित होते की हा आगामी फोन Galaxy S25 पेक्षा उंच, रुंद आणि पातळ असेल. पण फोनचे अंतिम स्वरूप वेगळे असू शकते.
डिव्हाइसच्या लीक झालेल्या स्पेसिफिकेशनवरून असे दिसून येते की यात Snapdragon 8 Elite Gen 5 (8 Elite 2) गॅलेक्सी चिपसेट, 4300mAh battery, १६ जीबी पर्यंत रॅम, ट्रिपल रिअर कॅमेरे असतील. फोनमध्ये अल्ट्रा-वाइड अँगल सेन्सर गेल्या वर्षीच्या Galaxy S25 पेक्षा अपग्रेड केला जाईल. पुढील वर्षी जानेवारीमध्ये हे डिव्हाइस ग्लोबल मार्केट मध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. सॅमसंग स्मार्टफोन आकर्षक Galaxy S26 Edge आणि Galaxy S26 Ultra सोबत लाँच होण्याची अपेक्षा आहे. Galaxy S26Pro हा गॅलेक्सी S25 चा थेट उत्तराधिकारी असण्याची अपेक्षा आहे, जो सध्या Amazon वर $719 मध्ये उपलब्ध आहे.
जाहिरात
जाहिरात