Samsung चा Galaxy Unpacked 2025 होणार 9 जुलैला; Foldables येणार ग्राहकांसमोर

Samsung Galaxy Unpacked 2025 चे लाईव्ह स्ट्रीमिंग Samsung.com, सॅमसंग न्यूजरूम इंडिया आणि सॅमसंग इंडियाच्या YouTube वर होणार आहे.

Samsung चा Galaxy Unpacked 2025 होणार 9 जुलैला; Foldables येणार ग्राहकांसमोर

Photo Credit: Samsung

सॅमसंग गॅलेक्सी अनपॅक्ड २०२५ हा कंपनीचा या वर्षीचा दुसरा कार्यक्रम आहे

महत्वाचे मुद्दे
  • Samsung Galaxy Unpacked 2025 हा कार्यक्रम 9 जुलैला IST वेळेनुसार संध्याका
  • Galaxy Z Fold 7 हा आतापर्यंतचा thinnest आणि सर्वात टिकाऊ फोल्डेबल फोन असे
  • Galaxy Watch 8 series, Galaxy Buds Core देखील 9 जुलैच्या Samsung Galaxy
जाहिरात

Samsung कडून Galaxy Unpacked event ची घोषणा करण्यात आली आहे. हा कार्यक्रम 9 जुलै 2025 दिवशी होणार आहे. या कार्यक्रमामध्ये दक्षिण कोरियाची ही प्रमुख कंपनी सॅमसंग त्यांच्या फोल्डेबल उपकरणांची पुढील सीरीज सादर करेल, ज्यांना Galaxy Z Fold 7 आणि Galaxy Z Flip 7 असे नाव दिले जाण्याची शक्यता आहे. Fold 7 आणि Flip 7 मध्ये काही इतर सरप्राईजेस असू शकतात, विशेषतः Galaxy Watch 8 series banner खाली 3 घड्याळं येऊ शकतात. लीक्समध्ये असे म्हटले आहे की हे Galaxy Watch 8 Classic, Galaxy Watch 8 आणि Galaxy Watch Ultra ची नवीन आवृत्ती आहे. सोबतच Galaxy Buds Core देखील असू शकतात.Serial tipster, Evan Blass ने 9 जुलै रोजी Unpacked event होणार असल्याच्या बातम्या काही दिवस आधीच लीक केल्या होत्या. औपचारिक घोषणेनंतर लगेचच टिपस्टरने X वर सॅमसंगवर टीका करत सॅमसंगला सवाल केला होता.

Galaxy Z Fold 7 मध्ये काय असेल खास?

सॅमसंगने जाहीर केले आहे की Galaxy Z Fold 7 हा आतापर्यंतचा thinnest आणि सर्वात टिकाऊ फोल्डेबल फोन असेल. त्याने अचूक परिमाण शेअर केलेले नाहीत, परंतु लीक झालेल्या फोटोंवरून आपल्याला काही संकेत मिळतात, ज्याच्या आधारे आपण Galaxy Z Fold 6 च्या तुलनेत "लक्षणीय" अधिक कॉम्पॅक्ट फोनची अपेक्षा करू शकतो. काही अहवालांमध्ये असे म्हटले आहे की हा फोन उघडल्यावर 3.9 मिमी इतका पातळ असू शकतो. वजनाच्या बाबतीत, तो सुमारे 215 ग्रॅम असल्याचे म्हटले जाते.

Galaxy Z Fold 7, Flip 7 प्री रिझर्व्ह कसा करता येणार?

Fold 7, Flip 7 चा मोठा यूएसपी हा त्यांची सुधारित डिझाइन असेल आणि जर सॅमसंग त्यांना कार्यात्मकदृष्ट्या अधिक आकर्षक बनवत असेल. ग्राहक लवकरच लाँच होणाऱ्या "ultra" फोल्डेबलचे आगाऊ आरक्षण करू शकता. ज्यात घड्याळ्यांचा समावेश नसेल केवळ फोन प्री बूक करताना 5999 रुपयांपेक्षा जास्त बचत करू शकणाऱ्या डील आणि सवलती लवकर मिळवू शकता. सॅमसंग या टप्प्यावर टोकन रक्कम म्हणून 1999 रुपये आकारेल जे तुम्ही लाँचनंतर डिव्हाइस खरेदी न करण्याचा निर्णय घेतल्यास परत करेल.

कुठे,कधी पहाल Samsung Galaxy Unpacked 2025 चा सोहळा

Samsung Galaxy Unpacked 2025 चे लाईव्ह स्ट्रीमिंग Samsung.com, सॅमसंग न्यूजरूम इंडिया आणि सॅमसंग इंडियाच्या YouTube वर केले जाईल. हा कार्यक्रम भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल.

Comments
Gadgets 360 Staff
 ...अधिक
        
    
फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. फोल्ड डिझाइनचा सॅमसंगचा नवा स्मार्टफोन भारतात दाखल; पहा फीचर्स
  2. Samsung Galaxy Z Fold 7 भारतात लॉन्च; इथे पहा किंमत, ऑफर्स आणि स्पेसिफिकेशन्स
  3. Galaxy Buds 3 Pro वर Amazon Prime Day सेलमध्ये मोठा डिस्काउंट जाहीर
  4. Amazon Prime Day 2025 मध्ये iQOO स्मार्टफोन्सवर जबरदस्त ऑफर्स जाहीर; पहा अपडेट्स
  5. 14 जुलै ला लॉन्च होणार्‍या Vivo X Fold 5 आणि X200 FE च्या किंमती इंटरनेट वर लीक
  6. आयफोनही आता येणार दमदार बॅटरीज सोबत; पहा iPhone 17 Pro Max बद्दलची अपडेट
  7. Honor X9c 5G भारतात 7 जुलै येतोय; 12 जुलै पासून विक्री होणार Amazon वर सुरू
  8. Amazon चा 72 तासांचा Prime Day सेल जाहीर; पहा स्मार्टफोन सह कोणत्या वस्तूंवर मिळणार सूट
  9. Nothing Headphone (1) भारतात लॉन्च; पहा प्रीमियम फीचर्स, किंमत इथे
  10. Nothing Phone (3) भारतात अखेर आलाच; किंमत ₹79,999 पासून सुरू
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »