सॅमसंग निराशाजनक विक्रीमुळे सॅमसंग ची Edge सीरीज बंद करण्याची योजना आखत असल्याचे वृत्त आहे.
Photo Credit: Samsung
2026 मध्ये Samsung Galaxy S26 Pro, S26 Plus, S26 Ultra सहित तीन S series लॉन्च
Samsung Galaxy S25 Edge मे महिन्यात लॉन्च करण्यात आला होता. हा Galaxy S series मधील सगळ्यात स्लीम फोन होता आणि त्याची जाडी केवळ 5.8mm आहे. Galaxy S25 लाइनअपमधील चौथे मॉडेल म्हणून स्लिम-प्रोफाइल डिव्हाइस लाँच करण्यात आले होते. आता, नवीन अहवालांनुसार दक्षिण कोरियन ब्रँडने Galaxy S26 Edge रद्द केला आहे. निराशाजनक विक्रीमुळे सॅमसंग ची Edge सीरीज बंद करण्याची योजना आखत असल्याचे वृत्त आहे. Edge मालिका सुरू ठेवण्याऐवजी, कंपनी flagship Galaxy S26 लाइनअपवर लक्ष केंद्रित करण्याची शक्यता आहे ज्यामध्ये Galaxy S26, Galaxy S26+ आणि Galaxy S26 Ultra यांचा समावेश असेल.
साऊथ कोरियन पब्लिकेशन Newspim च्या माहितीनुसार, Samsung ने त्यांचाultra-slim smartphone line रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. सॅमसंग आता 2026 मध्ये स्टॅन्डर्ड Galaxy S26, Galaxy S26+ आणि Galaxy S26 Ultra models सह त्याच्या नेहमीच्या पद्धतीला चिकटून राहण्याची अपेक्षा आहे. प्रकाशनाच्या दाव्यानुसार, सॅमसंगने त्यांच्या कर्मचाऱ्यांना Edge सीरीज आणि Galaxy S26 Edge बंद करण्याची सूचना दिली आहे. निवडक बाजारपेठांमध्ये आधीच उपलब्ध असलेला Galaxy S25 Edge, आताच्या इन्व्हेंटरी विकल्यानंतर बंद होण्याची शक्यता आहे.
Galaxy S25 Edge विक्रीबद्दल बोलायचे झाले तर, Hana Investment & Securities ने अहवाल दिला आहे की या स्मार्टफोनने फक्त 1.31 मिलियन युनिट्स फोनची विक्री केली आहे. तर इतर Galaxy S25 मॉडेल्सची विक्री 12.18 मिलियन युनिट्सपर्यंत झाली आहे, जी खूपच प्रभावी आहे.
Galaxy S25 Edge मध्ये 3900mAh बॅटरी आणि गॅलेक्सीसाठी कस्टम Snapdragon 8 Elite चिप आहे. हँडसेटमध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेटसह 6.7 इंचाचा डिस्प्ले आणि ड्युअल रिअर कॅमेरा युनिट आहे.फोनचा आकार 158.2×75.6×5.8mm आणि वजन163 ग्रॅम आहे.
2026 मध्ये सॅमसंग तीन Galaxy S series smartphones बाजारात आणण्याचा अंदाज आहे. Galaxy S26 Pro, Galaxy S26 Plus आणि Galaxy S26 Ultra चा त्यामध्ये समावेश असू शकतो. “Pro” model हे बेस व्हेरिएंटचे नवं नाव असू शकतं. फोनचा परफॉर्ममन्स पाहता सॅमसंग त्यांची in-house Exynos 2600 chip किमान base आणि Plus variants साठी वापरू शकते. ultra variant मध्ये Qualcomm चा Snapdragon 8 Elite Gen 5 processor असू शकतो असा अंदाज आहे.
जाहिरात
जाहिरात