Amazon सेल 2025 मध्ये Samsung Galaxy S24 Ultra 5G हा स्मार्टफोन 71,999 रुपयांना उपलब्ध असेल.
Amazon Sale 2025: सॅमसंग स्मार्टफोन्सवरील सर्वोत्तम डील
भारतात आज शारदीय नवरात्रीसोबतच अमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलचीही सुरूवात झाली आहे. प्राईम मेंबर्सना 22 सप्टेंबर तर अन्य ग्राहकांना 23 सप्टेंबरपासून खरेदी करता येणार आहे. या सेलमध्ये ग्राहकांना विविध वस्तूंवर मोठी सूट देण्यात आली आहे. सॅमसंगचे फोन्स देखील त्याला अपवाद नाहीत. यामध्ये सॅमसंगच्या फ्लॅगशीप Galaxy S आणि Galaxy Z series पासून बजेट फ्रेंडली Galaxy M आणि Galaxy A series फोन्सचा समावेश आहे. अमेझॉनच्या सेल दरम्यान ग्राहकांना सॅमसंग स्मार्टफोनवर सर्वोत्तम डील मिळू शकतात. तर, जर तुम्हाला Amazon Great Indian Festival 2025 सेल दरम्यान कोणता सॅमसंग स्मार्टफोन खरेदी करायचा असेल, तर अमेझॉन सेल मध्ये नशीब आजमवू शकता.
Amazon Great Indian Festival Sale 2025 हा प्राइम सदस्यांसाठी सुरू करण्यात आलाआहे, तर इतर सदस्यांसाठी हा सेल 23 सप्टेंबर 2025 पासून सुरू होईल. सेल दरम्यान, नव्या सॅमसंग स्मार्टफोन खरेदीवर 65,000 रुपयांपर्यंत बचत करता येणार आहे. शिवाय, सेलमध्ये SBI क्रेडिट आणि डेबिट कार्डवर 10 टक्के इन्स्टंट सूट देखील मिळणार आहे. याशिवाय, ग्राहकांना नो-कॉस्ट EMI पर्यायांसह एक्सचेंज ऑफर्सवर काही अतिरिक्त सूट देखील मिळेल.
Amazon सेल 2025 मध्ये Samsung Galaxy S24 Ultra 5G हा स्मार्टफोन ७१,९९९ रुपयांना उपलब्ध असेल. या स्मार्टफोनमध्ये 6.8-इंचाचा QHD+ AMOLED डिस्प्ले, Snapdragon 8 जनरेशन 3 प्रोसेसर, मागील बाजूला 200 मेगापिक्सेल क्वाड-कॅमेरा सेटअप, अनेक AI फीचर्स आणि बरेच काही यासारखे मनोरंजक फीचर्स मिळणार आहेत. यामुळे तो सेल दरम्यान खरेदी करू शकता अशा सर्वोत्तम फ्लॅगशिप स्मार्टफोनपैकी एक आहे.
मॉडेल | लिस्ट किंमत | सेल मधील किंमत |
Samsung Galaxy A55 5G | Rs. 42,999 | Rs. 23,999 |
Samsung Galaxy M06 5G | Rs. 12,499 | Rs. 7,499 |
Samsung Galaxy M16 5G | Rs. 17,499 | Rs. 10,499 |
Samsung Galaxy Z Fold 6 | Rs. 1,64,999 | Rs. 1,10,999 |
Samsung Galaxy A26 5G | Rs 27,999 | Rs. 23,999 |
Samsung Galaxy S24 Ultra | Rs. 1,34,999 | Rs. 71,999 |
Samsung Galaxy M36 5G | Rs. 22,999 | Rs. 13,999 |
Samsung Galaxy A56 5G | Rs. 48,999 | Rs. 35,999 |
Samsung Galaxy S25 | Rs 80,999 | Rs. 68,999 |
Samsung Galaxy S25 Ultra | Rs. 1,29,999 | Rs. 1,12,499 |
जाहिरात
जाहिरात