Photo Credit: Tecno
Tecno Pova 6 Neo 4G (चित्रात) २०२४ मध्ये भारतात लाँच झाला नव्हता.
Tecno Pova 7 Neo 4G लवकरच काही निवडक इंटरनॅशनल मार्केट मध्ये उपलब्ध होणारा स्मार्टफोन आहे. सध्या या आगामी स्मार्टफोनचे काही फोटोज लीक झाले आहेत. या लीक झालेल्या फोटोंवरून फोनमधील काही फीचर्स, डिझाईन स्पेसिफिकेशन्सचा अंदाज लावला जात आहे. ऑनलाईन रिपोर्ट्स वरून फोनमध्ये असलेल्या रिटेल पॅकेज आणि काही त्यांच्या प्रायमरी फीचर्सची माहिती मिळाली आहे. असा अंदाज आहे की बेस 7 5G आणि Pova 7 Ultra 5G variants सोबत आता कंपनीकडून Pova 7 Neo 4G variant येणार आहे. हे व्हेरिएंट Tecno Pova 6 Neo 4G ची जागा घेणार आहे. हे भारतामध्ये उपलब्ध नाही, या स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G99 Ultimate chipset चा समावेश आहे.
Passionategeekz post कडून लीक झालेल्या फोटोज नुसार, Tecno Pova 7 Neo 4G हा स्मार्टफोन दिसायला आकर्षक आहे. त्यामध्ये त्रिकोणाकृती rear camera module चा समावेश आहे. स्क्रीनच्या वरच्या डाव्या कोपऱ्यात त्याची जागा आहे . कॅमेरा आयलंडमध्ये दोन कॅमेरे आणि एक एलईडी फ्लॅश आहे. फोन काळ्या रंगात उपलब्ध आहे. रिटेल पॅकेजिंगचे फोटो देखील रिपोर्ट मध्ये आहे.
जारी रिपोर्ट्स नुसार Tecno Pova 7 Neo 4G मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.78-इंचाचा फुल-एचडी+ डिस्प्ले असण्याचा अंदाज आहे. MediaTek Helio G100 CPU आणि 16GB पर्यंत रॅम - ज्यामध्ये "virtual RAM" समाविष्ट आहे जी त्याला पॉवर देऊ शकते. असा अंदाज आहे की स्मार्टफोनमध्ये 256GB internal storage असेल.
रिपोर्ट्सनुसार, Tecno Pova 7 Neo 4G मध्ये Tecno AI क्षमता आहेत. धूळ आणि स्प्लॅश रोखण्यासाठी हा फोन IP64-रेटेड असेल असा अंदाज आहे. रिपोर्ट्सनुसार, यात 45W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी 7,000mAh बॅटरी असेल.
खास म्हणजे Tecno Pova 6 Neo 4G मध्ये 7,000mAh बॅटरी, 6.78-इंच 120Hz फुल-एचडी+ डिस्प्ले आणि MediaTek Helio G99 Ultimate SoC आहे. अलिकडच्याच एका अफवेनुसार, Tecno Pova 7 Neo 4G, मॉडेल क्रमांक LJ6, Google Play Console वर लिस्ट करण्यात आला होता. तो Android 15 सह येण्याची आणि 8GB RAM ला सपोर्ट करण्याची अपेक्षा आहे.
जाहिरात
जाहिरात