Tecno या स्मार्टफोन कंपनीने नुकताच त्यांच्या spark सिरीज मधील पुढचा Tecno spark go 1 हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन म्हणजे अगदी परवडणारा आणि बजट फ्रेंडली असा स्मार्टफोन असणार आहे. लॉन्च केल्यानंतर कंपनीने आपल्या अधिकृत वेबसाईटवर याला सूचीबद्ध केले आहे. चला तर मग बघूया Tecno च्या नवीन स्मार्टफोनची वैशिष्ट्ये आणि बरेच काही.
Tecno Spark Go 1 किंमत आणि उपलब्धता.
Tecno Spark Go 1 हा स्मार्टफोन काळया आणि पांढऱ्या अशा दोन रंगांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. याव्यतिरिक्त स्टोरेज आणि रॅमच्या आधारे या स्मार्टफोनचे चार प्रकार पडतात. ज्यामध्ये 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज, 8GB रॅम आणि 64GB स्टोरेज, 6GB आणि 128GB स्टोरेज व 8GB आणि 128GB स्टोरेज हे मुख्य चार प्रकार आहेत.
Tecno ने जरी आपला स्मार्टफोन Tecno Spark Go 1 लॉन्च केला असला तरीसुद्धा हा स्मार्टफोन खरेदीसाठी उपलब्ध करण्यात आलेला नसून या स्मार्टफोनच्या किंमत आणि उपलब्धते बाबत कोणतीही स्पष्टता कंपनीकडून देण्यात आलेली नाही आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी तुम्हाला अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे.Tecno Spark Go 1 ची वैशिष्ट्ये
Tecno spark go 1 या स्मार्टफोनमध्ये पंच होल कट आऊट सोबत कंपनीचा अधिकृत डायनॅमिक पोर्ट असलेला 6.67 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. 120Hz चा रिफ्रेश रेट असणाऱ्या या स्क्रीनमध्ये HD+ रेसोल्यूशन मुळे एक वापरकर्त्यांना दृश्यांचा चांगला अनुभव मिळतो.
या स्मार्टफोनच्या मागील बाजूस गोलाकार आकारात दोन कॅमेऱ्यांचा सेटअप LED फ्लॅश लाईट सोबत देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 13 मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा हा 8 मेगापिक्सलच्या सेन्सर सोबत देण्यात आला आहे. यामध्ये 8 मेगापिक्सलचा कॅमेरा सेल्फी काढण्यासाठी स्मार्टफोनच्या समोरील बाजूस मध्यभागी जोडण्यात आला आहे.
Tecno spark go 1 या स्मार्टफोनचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही हा स्मार्टफोन तेलकट किंवा ओल्या हातांनी देखील वापरू शकता ज्यासाठी या स्मार्टफोनला IP54 रेटिंग सुध्दा मिळाली आहे. हा स्मार्टफोन Unisoc T615 या चीपसेट द्वारे समर्थित असून स्मार्टफोनच्या उजव्या बाजूस पॉवर बटन आणि अतीसुरक्षेसाठी फिंगर प्रिंट स्कॅनर जोडण्यात आला आहे.
या स्मार्टफोनमध्ये 5000 mAh ची बॅटरी देण्यात आलेली असून 15 वॅटच्या चर्जिंगचे समर्थन करते. Tecno ही स्मार्टफोन कंपनी सध्या Mega pad 10 आणि Mega pad 11 नावाच्या नवीन टॅबलेट वर काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. याव्यतिरिक्त नजीकच्या भविष्यात Tecno चे आगामी अन्य उपकरण लवकरच लॉन्च होतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Tecno spark go 1 हा स्मार्टफोन खरेदीसाठी कंपनीकडून कोठे आणि केव्हा उपलब्ध करण्यात येणार असून याची किंमत काय असेल हे जाणून घेण्यासाठी आमच्यासोबत जोडून रहा.