HP चे नवीन Snapdragon पॉवर्ड लॅपटॉप, जे दीर्घ बॅटरी लाइफसाठी बनवले आहेत, ते देखील सवलतीच्या दरात दाखवले जात आहेत.
Photo Credit: Amazon
अमेझॉन इंडियाने १६ जानेवारी २०२६ पासून सुरू होणाऱ्या ग्रेट रिपब्लिक डे सेलची घोषणा केली आहे.
Amazon India या ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर Great Republic Day Sale सुरू होण्यास अजून काही दिवस बाकी आहेत, तरीही 16 जानेवारीसाठी आधीच प्रीव्ह्यू केलेले लॅपटॉप लिस्टिंग समोर आले आहेत. सुरुवातीच्या लाइनअपमध्ये ASUS Vivobook 14 आणि HP च्या i3/i5 मॉडेल्स सारख्या रोजच्या वापराच्या मशीन्सपासून ते RTX 3060 सह ASUS TUF सारख्या परफॉर्मन्स-चालित पर्यायांपर्यंत सर्व काही समाविष्ट आहे. HP चे नवीन Snapdragon पॉवर्ड लॅपटॉप, जे दीर्घ बॅटरी लाइफसाठी बनवले आहेत, ते देखील सवलतीच्या दरात दाखवले जात आहेत. जे ग्राहक लॅपटॉप अपग्रेडसाठी थांबत आहेत त्यांच्यासाठी हा सेल फायद्याचा ठरणार आहे. Acer, Asus, Lenovo, Dell, HP सारख्या टेक कंपन्यांकडून लॅपटॉप खरेदी करताना ग्राहकांना त्यांची बचत जास्तीत जास्त करता येईल.
अमेझॉन लँडिंग पेज वर सध्या किंमतीची झलक दिसत आहे पण त्या उघड करत नाही. पहिले पाच मॉडेल उत्पादकता, मल्टीटास्किंग आणि व्यवसाय वापरासाठी डिझाइन केलेले असले तरी, शेवटचे दोन गेमिंग लॅपटॉप आहेत ज्यात खास एनव्हीडिया जीटीएक्स ग्राफिक्स चिप्स आहेत.
मॉडेल स्टोरेज किंमत डिल प्राईज
Acer Aspire AMD Ryzen 5 (16GB + 512GB) Rs. 61,999 Rs. 3X,990
Asus Vivobook 15 AMD Ryzen 7 (16GB + 512GB) Rs. 57,990 Rs. 4X,990
Lenovo IdeaPad Slim 3 Intel Core i5 (16GB + 256GB) Rs. 70,990 Rs. 4X,990
HP 15 Intel Core i5 (16GB + 512GB) Rs. 65,387 Rs. 5X,990
Acer Aspire Go 14 Intel Core Ultra 5 (16GB + 512GB) Rs. 72,999 Rs. 5X,990
ASUS TUF A15 Ryzen 7, RTX 3050 (64GB + 512GB) Rs. 83,990 Rs. 6X, 990
Dell SmartChoice Intel Core i5, RTX 3050 (16GB + 1TB SSD) Rs. 1,01,709 Rs. 7X,990
अमेझॉन एसबीआय क्रेडिट कार्ड यूजर्सना आणि ईएमआय व्यवहारांवर 10% instant discount देत आहे. त्याव्यतिरिक्त, अमेझॉन पे आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्ड धारक संपूर्ण सेलमध्ये अमर्यादित 5% कॅशबॅक मिळवू शकतात. या सेलमध्ये Prime welcome rewards म्हणून 2500 पर्यंतची सूट देखील ग्राहकांना मिळणार आहे. निवडक डिव्हाईसेस वर ग्राहकांना 12 महिन्यांसाठी नो कॉस्ट ईएमआयचा पर्याय मिळणार आहे.
ces_story_below_text
जाहिरात
जाहिरात
Redmi Note 15 Pro 5G India Launch Seems Imminent After Smartphone Appears on Geekbench