Photo Credit: Vivo
Vivo X200 FE हा अंबर येलो, फ्रॉस्ट ब्लू आणि लक्स ग्रे रंगांमध्ये विकला जातो
Vivo ने 14 जुलै दिवशी दोन फोन लॉन्च केले आहेत. त्यात Vivo X Fold 5 सोबत X200 FE चा समावेश आहे. The X200 FE हा विवो कंपनीचा X200 series मधील नवा फोन आहे, जो कॉम्पॅक्ट आणि फीचर रीच हॅन्डसेट आहे. दरम्यान भारतात लॉन्च होण्यापूर्वी X200 FE जून महिन्यात ताईवान मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. Vivo X200 FE हा स्मार्टफोन 23 जुलैपासून फ्लिपकार्ट आणि Vivo इंडिया च्या ऑनलाइन स्टोअरवरून खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. सध्या तो प्री-ऑर्डरसाठी खुला आहे. त्यामुळे जाणून घ्या विवो च्या नव्या फोन मधील खास फीचर्स, स्पेसिफिकेशन्स काय आहेत?X200 FE मधील स्पेसिफिकेशन्स काय?X200 FE मध्ये 6.31-inch AMOLED screen असून त्यामध्ये 1.5K resolution of 1,216 x 2,640 pixels आहेत. हा फोन 120Hz refresh rate ला सपोर्ट करतो तर 1,800 nits of peak brightness आहे. X200 FE हा फोन मध्ये MediaTek Dimensity 9300+ processor आहे तर Funtouch OS 15 based on Android 15 वर फोन चालतो. फोनचं स्टोरेज UFS 3.1 आहे आणि फोन मध्ये 16GB of LPDDR5X RAM चा समावेश आहे.
X200 FE मधील कॅमेरा पाहता तो 50-megapixel Sony IMX921 primary sensor with optical image stabilisation (OIS) सह आहे. 8-megapixel ultra-wide camera सोबत 120-degree field of view आहे. 50-megapixel Sony IMX882 periscope telephoto lens आहे. फोनच्या फ्रंट बाजूला 50-megapixel camera हा सेल्फी आणि व्हिडीओ कॉल साठी आहे.
X200 FE मध्ये 6,500mAh battery चा समावेश असणार आहे. ज्याला 90W wired fast charging चा सपोर्ट असेल. सोबत फोनला in-display fingerprint scanner आहे. 5G, 4G LTE, Wi-Fi, Bluetooth 5.4, GPS, NFC, आणि OTG चा सपोर्ट असणार आहे. या फोनला IP68आणि IP69रेटिंग असल्या ने फोन धूळ, पाण्यापासून सुरक्षित असणार आहे.
Vivo X200 FE हा दोन कॉन्फ्युगरेशन मध्ये उपलब्ध असून 12GB RAM with 256GB ची किंमत 54,999 रूपये आणि 16GB RAM with 512GB storage ची किंमत 59,999 रूपये आहे. हा फोन Amber Yellow, Frost Blue, आणि Luxe Grey या रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे.
जाहिरात
जाहिरात